राजकोट: तोंडात मावा ठेवून स्विमिंग पूलमध्ये पोहोण्यासाठी जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. चुना, सुपारी आणि तंबाखूच्या मिश्रणानं तरुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याचे प्राण वाचले. मात्र त्याच्या श्वसननलिकेला इजा झाली असून त्याच्या फुफ्फुसाला छिद्र पडलं आहे.जगदिश चावडा नावाचा २६ वर्षीय तरुण त्याच्या मित्रांसह अमरेलीमधील स्विमिंग पूलमध्ये ३० एप्रिलला पोहायला गेला होता. पोहोताना त्याचं डोकं स्विमिंग पूलच्या भिंतीला आपटलं. डोकं जोरात आदळल्यानं त्याच्या मानेला जोरदार झटका बसला. यावेळी त्याच्या तोंडात मावा होता. मानेला झटका बसताच तोंडातील मावा गिळला गेला. सुपारीचे तुकडे श्वसननलिकेत गेले. त्यामुळे श्वसननलिकेला गंभीर इजा झाली.
अबोल स्वभाव, ना कोणाच्या अध्यात ना मध्यात; भावी डॉक्टरनं मरण जवळ केलं; बंद खोलीत काय घडलं?
जुनागढचा रहिवासी असलेल्या चावडाला श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्रास बळावत चालल्यानं पाच दिवसांनी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टर ब्रिजेश कोयानी आणि डॉक्टर अवनी मेंडपारा यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले.

‘सुपारीचे तुकडे श्वसननलिकेत जाऊन अडकले होते. ते काढणं अवघड होतं. त्यामुळे त्याचा जीव वाचवण्याचं आव्हान होतं. त्याच्या मानेचं हाड फ्रॅक्चर झालं. सुपारीच्या तुकड्यांमुळे त्याच्या डाव्या फुफ्फुसाला संसर्ग झाला. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली होती,’ असं डॉक्टरांनी सांगितलं.
माझं कुंकू गेलं! मृतदेहाजवळ बसून महिला धाय मोकलून रडली; पोलिसाला शंका; धक्कादायक प्रकार उघड
व्हिडीओ ब्रोंचोस्कोपीच्या माध्यमातून डॉक्टरांनी चावडाच्या श्वसननलिकेतून सुपारीचे आठ तुकडे, काही रक्ताच्या गाठी बाहेर काढल्या. त्यानंतर पुढील १२ दिवस रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. त्यानंतर आठवडाभर त्याला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. मानेला झालेल्या दुखापतीवर उपचार म्हणून स्पाईन सर्जरी करण्यात आली. हातपाय आणि छाती पूर्ववत होण्यासाठी रुग्णाला फिजियोथेरेपीचा आधार घ्यावा लागणार आहे. माव्याच्या व्यसनाचा असा गंभीर परिणाम पहिल्यांदाच पाहिल्याचं डॉक्टर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here