म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पावसाळी कामांच्या योग्य नियोजनामुळे गेल्या दहा वर्षांत कोकण रेल्वेवर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक खोळंबलेली नाही. यंदाही याच पद्धतीने पावसाळापूर्व कामांचे नियोजन कोकण रेल्वेने पूर्ण केले आहे.

पावसाळ्यात अनुचित घटना टाळण्यासाठी ६७३ प्रशिक्षित रेल्वे कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. घाटात अतिमुसळधार पावसामुळे दृष्यमानता खालावून होणारे अपघात टाळण्यासाठी ४० किमीप्रतितास सुरक्षित वेगाने गाड्या चालवण्याच्या सूचना सर्व लोकोपायलटला कोकण रेल्वेने दिलेल्या आहेत. रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्ष आणि स्थानकांशी अतूट संपर्क राखण्यासाठी मोबाइल फोन देण्यात आले आहेत. मेल-एक्स्प्रेसच्या लोकोपायलट आणि गार्डला वॉकी-टॉकी देण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत माहिती पुरवण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर आपत्कालीन संवाद केंद्र (ईएमसी) स्थापित करण्यात आले आहे. सर्व मुख्य सिग्नल एलईडीमध्ये रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाल्याने धुक्यांमध्ये सिग्नल अधिक चांगले दिसणार आहेत.

तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष

– बेलापूर, रत्नागिरी, मडगाव

– २४ तास राहणार सुरू

१० जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल होणार आहेत. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्याआधी www.konkanrailway.com यावर भेट द्यावी किंवा १३९ वर संपर्क साधावा, असे आवाहन कोकण रेल्वेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे उपमहाव्यवस्थापक गिरीश करंदीकर यांनी केले आहे.

९ ठिकाणी स्वंयमोजणी पर्जन्यमापक

माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकल आणि उडुपि या नऊ स्थानकावंर स्वयंमोजणी करणारे पर्जन्यमापक कार्यान्वित करण्यात आले आहे.

वर्ल्ड कप: कोणत्याही परिस्थितीत भारताविरुद्ध अहमदाबादला खेळणार नाही; पाक बोर्डाने ICCला कळवले

पूर इशारा यंत्रणा

कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यास त्याची माहिती कोकण रेल्वे नियंत्रणात कक्षात मिळणार आहे. अशी पूर इशारा यंत्रणा तीन ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे.

– काळी नदी (मानगाव आणि वीर )

– सावित्री नदी (वीर आणि सापे वामणे)

– वशिष्टी नदी (चिपळूण आणि कामथे)
Crime: मिरारोडच्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी पाऊल ठेवताच फक्त पाय दिसले, उर्वरित धड गायब, लिव्ह इनमधील महिलेची हत्या

चार ठिकाणी वायूवेग यंत्र

रत्नागिरी ते निवासरदरम्यान वाहणाऱ्या हवेचा वेग मोजण्यासाठी पनवेलमध्ये वायूवेग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. थिविम आणि करमाळीसाठी मांडवी पुलावर, करमाळी आणि वेरणासाठी झुआरी पुलावर, होनावर आणि मनकीसाठी शरावती पूलावर वायुवेग यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. वाऱ्याचा वेग वाढल्यास त्याबाबत माहिती नियंत्रण कक्षाला तातडीने मिळणार आहे.
RBI MPC Meeting: आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार, तुमच्या गृहकर्जावर कसा होणार परिणाम? समजून घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here