नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांना फायदा मिळवून देण्यासाठी सरकारद्वारे अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना चांगलीच प्रसिद्ध आहे. मार्च २०२३ नंतर केंद्र सरकार आता लवकरच पुन्हा एकदा अल्प बचत योजनेच्या व्याजदराचा आढावा घेणार असून या महिन्याअखेरीस लहान बचत योजनांचे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. यापैकी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे PPF योजनेचा व्याजही वाढण्याची अपेक्षा आहे.

एप्रिल २०२० पासून सरकारने PPF खात्याच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. सरकार दर तीन महिन्यांनी छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेते आणि त्यात बदल करते. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) म्हणजे २०२३-२४ बद्दल बोलायचे तर ३१ मार्च रोजी व्याज दरात बदल करण्यात आले होते.

SCSS की म्युच्युअल फंड; निवृत्तीनंतर कमाईची चिंता सोडा, समजून घ्या कुठे गुंतवणुक ठरेल फायदेशीर
PPF व्याज तीन वर्षांपासून ‘जैसे थे’
लक्षणीय आहे की PPF योजनेच्या व्याज दरांमध्ये शेवटचा बदल २०२० मध्ये करण्यात आला होता. तर १ एप्रिल २०२२ रोजी सरकारने व्याजदर ७.९% वरून ७.१% पर्यंत कमी केले होते, आणि त्यानंतर या योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याशिवाय मार्च २०२३ केंद्र सरकारने अनेक लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली होती, परंतु पीपीएफचे दर ७.१% वर परिवर्तित ठेवले होते. परंतु यावेळी जून २०२३ अखेरपर्यंत सरकार व्याजदर वाढवण्याचा विचार करेल, पीपीएफ खातेधारकांना आशा आहे.

..तर तुमचं पीपीएफ खातं बंद होणार!

वित्त मंत्रालयाने मार्च २०२३ मध्ये पोस्ट ऑफिस बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या व्याजदरात ०.७०% पर्यंत वाढ केली होती, परंतु पीपीएफचा व्याजदर ‘जैसे थे’ ठेवला होता.

सर्वसामान्यांना मोठा धक्का, या योजनांमध्ये १० लाखांच्या गुंतवणुकीवर उत्पन्नाचा दाखला बंधनकारक
PPF मध्ये गुंतवणुकीत कर लाभ
सरकारची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना करदात्यांसाठी फायदेशीर मानली जाते. या योजनेत तुम्हाला आयकर कलम ८०सी अंतर्गत १.५ लाखांच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. तसेच या योजनेअंतर्गत जमा रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लागू होत नसून तुम्हाला पीपीएफच्या मॅच्युरिटी रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही. लक्षात घ्या की या योजनेचा लॉक इन कालावधी १५ वर्षांचा असून जर तुम्हाला EPF आणि राष्ट्रीय पेन्शन, या योजनांमध्ये गुंतवणूक करायची नसेल, तर तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक करून तुमच्या निवृत्तीनंतर मजबूत रिटर्न मिळवू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here