मुंबई : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दौलत या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाचा सोहळा राजभवनात पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मंत्री शंभूराज देसाई, गिरीश महाजन, मगंलप्रभात लोढा, दादा भुसे, गुलाबराव पाटील, नरहरी झिरवळ आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. दौलत या ग्रंथाचं लेखन मधुकर भावे यांनी केलं आहे. राहुल नार्वेकर यांनी यावेळी बोलताना मोठं वक्तव्य केलं.

काही लोकं आपल्या कर्तुत्त्वातून कार्यातून आपल्याला घडवतात. काही लोकं आपल्या कर्तुत्त्वातून समाज घडवतात, देश घडवतात. लोकनेते बाळासाहेब देसाई हे त्यातलं एक व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी आपल्या कार्यातून समाज घडवला, ज्यांनी आपल्या कार्यातून राज्य घडवलं,असं राहुल नार्वेकर म्हणाले.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सातत्यानं ७ टर्म त्यांनी विधिमंडळात काम केलं. आपल्या १४ व्या विधानसभेपर्यंत अनेक कार्यकारी मंडळ कार्यरत राहिली. अनंत काळापर्यंत आपलं नाव दर्शवणारं काम केलं त्यांचं नाव म्हणजे लोकनेते बाळासाहेब देसाई होय. ज्या ज्या खात्यात काम केलं तिथं ऐतिहासिक असे निर्णय घेतले. ईबीसी म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील मुलांना सवलतीत शिक्षण द्यावं असा निर्णय बाळासाहेब देसाईंनी निर्णय घेतला, असं नार्वेकर यांनी सांगितलं.
WTC Final 2023: मैदानात पाय ठेवताच रोहित-विराटने रचला विक्रम, वर्ल्ड चॅम्पियन धोनीलाही टाकलं मागे
महसूल कायद्यात काम करत असताना, नवी महसूल कायदा असो, कुळ कायदा असो त्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतले. मालोजीराजेंनतर सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी बाळासाहेब देसाईंकडे आले त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं. गृह खात्याची जबाबदारी असताना नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे पोलीस आयुक्तालय बांधण्याचं काम त्यांनी केलं. ज्या ज्या खात्यात त्यांनी काम केलं त्या त्या खात्यात क्रांतिकारी काम करुन त्यांनी ठसा राज्यात मांडला, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
WTC Final Ind v Aus: IPLमधील अपमानाचा ट्रेविस हेडने असा घेतला बदला; भारतीय गोलंदाज हतबल
बाळासाहेब देसाई यांनी १९७७-७८ मध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केलं. देसाई यांनी ज्या प्रमाणं क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यातून काही तरी शिकून आज मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, असं राहुल नार्वेकर म्हणाले. माझ्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं ही भाग्याची गोष्ट आहे. या पुस्तकाचं नाव अत्यंत योग्य आहे. पुढील पिढीसाठी हा ग्रंथ दौलत म्हणून असणार आहे, असं नार्वेकर म्हणाले.

Konkan Railway : कोकण रेल्वेचं पावसाळ्यासाठी मेगा प्लॅनिंग, ६७३ कर्मचारी अ‍ॅलर्ट मोडवर, चतुःसूत्री राबवणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here