नवी दिल्ली : गुंतवणूकदार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण समितीच्या (MPC) अंतिम निकालाची वाट पाहत असताना आज सोन्याचे दर घसरणीसह उघडले. कालच्या व्यवहार सत्रात घसरणीसह किरकोळ विक्री झाल्यानंतर आज भारतीय बाजारात मौल्यवान धातूंचे दर संमिश्र कल दर्शवत आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो दर ६.५% वर कायम ठेवण्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव सपाट राहिले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात घसरण झाली असताना, गुरुवारी, ८ जून रोजी चांदीच्या दरात वाढ झाली आहे. बुधवारीही सोन्याच्या देशांतर्गत वायदा किमतींमध्ये घसरण दिसून आली.

केवळ २ महिन्यात पाच लाख महिलांनी केली ३६६६ कोटींची बचत ; काय आहे सरकारची योजना?
सोन्या-चांदीचा आजचा भाव काय?
ऑगस्ट २०२३ मध्ये मॅच्युअर होणारे सोन्याचे फ्युचर्स MCX वर ७ रुपये किंवा ०.०१% किंचित घसरून ५९ हजार ५२८ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. तर ५ जुलै २०२३ रोजी मॅच्युअर होणाऱ्या चांदीचे फ्युचर्स ११७ रुपये किंवा ०.१६% वाढीसह ७१ हजार ८९० रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहेत. विशेष म्हणजे ७ जून रोजी सोन्या आणि चांदीचा बाजार बंद भाव अनुक्रमे ५९,५०३ रुपये प्रति १० ग्रॅम आणि ७१ हजार ७२५ रुपये प्रति किलो होता.

या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते

तुम्ही पण व्हा श्रीमंत! कमी पगार पण तुम्हालाही करोडपती होता येईल, हा खास फॉर्म्युला पडेल उपयोगी
सोन्याची शुद्धता तपासून घ्या…
सोन्याचे दागिने किंवा नाणी करताना तुम्ही ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास तुम्ही या अ‍ॅपद्वारे तक्रार नोंदवू शकता. तर या अ‍ॅपद्वारे तुम्हाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ समजेल. देशात सोन्या आणि चांदीच्या किमती डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यासह अनेक घटकांच्या आधारे निश्चित केल्या जातात. जागतिक मागणी देखील मौल्यवान धातूंचे दर निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here