या प्रकरणात सिटीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख उजेर शेख अमीन (रा. फाजलपूरा) याचा पहिल्या पत्नीसोबत रीतसर तलाक झाला. याची माहिती शेख उजेर यांनी लग्नापूर्वी फिर्यादी महिलेला दिली होती. त्यानंतर शेख उजेर यांनी फिर्यादीसोबत लग्न केले. लग्न झाल्यानंतर शेख उजेर यांनी फिर्यादीला घरगुती कारणावरून शिवीगाळ सुरू केली. ‘आई-वडिलांनी हुंडा दिला नाही. हिमायत बाग येथे घर बांधण्यासाठी एक लाख रुपये आण,’ असे म्हणून तिचा छळ सुरू केला. महिलेला बेदम मारहाणही केली.
या प्रकरणात महिलेचे पती शेख उजेर यांनी पहिल्या पत्नीसोबत तडजोड झाली असल्याचे सांगितले. ‘ती आजपासून माझ्यासोबत राहणार आहे,’ असे सांगून दुसऱ्या पत्नीला हाकलून दिले. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून शेख उजेर शेख अमीनसह सासू, सासरे, सवतीविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला तक्रार निवारण केंद्रात अर्ज
या प्रकरणात महिलेने पतीसह सासऱ्याविरोधात तक्रार निवारण केंद्रात तक्रार अर्ज दिला होता. महिला तक्रार निवारण केंद्राने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे सांगितले. यानंतर सिटीचौक पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.