नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याची शक्यता आहे. गेल्या १३ महिन्यांपासून राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. २२ मे २०२२ रोजी इंधन दरात अखेरचा बदल करण्यात आला होता आणि तेव्हापासून इंधनाचे दर ‘जैसे थे’ आहेत. पेट्रोलियम मंत्रालय किंमती कमी करण्याचा विचार करत असून येत्या काही महिन्यांत जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठा दिलासा मिळू शकतो.

पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांकडून (OMC) पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती कमी करण्याची अपेक्षा केली जाऊ शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली होती, परिणाम सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलही महागले. अशा स्थितीत सामान्य जनतेला दिलासा म्हणून केंद्र आणि राज्य सरकारांनी इंधन दरात कपात जाहीर केली होती. जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले, पण तरीही भारतात इंधनाचे दर वाढवण्यात आले नसल्यामुळे तेल कंपन्यांना बरंच नुकसान सोसावं लागत होतं.

RBI Policy: कर्जदारांना दिलासा कायम! नाही वाढणार तुमच्या कर्जाचा हप्ता, आरबीआयच्या रेपो दरात बदल नाही
नंतर क्रूड ऑइलचे दर स्थिरावल्यावरही तेल कंपन्या आपलं नुकसान भरून काढत असल्यामुळे इंधनाचे दर कमी झाले नाहीत. मात्र, आता या नुकसानाची बऱ्यापैकी वसुली पूर्ण झाली असून तेल कंपन्यांचा ताळेबंदही नफ्यात आला आहे आणि म्हणूनच, येत्या काही दिवसांत तेलाचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पेट्रोलियम मंत्रालयाकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याच्या तेल कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.

राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

कच्च्या तेलाच्या किमती काय?
जागतिक बाजारात गेल्या वर्षी विक्रमी स्तरावर पोहोचलेल्या कच्च्या तेलाच्या किमती बऱ्यापैकी खाली घसरल्या आहेत. ब्रेंट क्रूड तेल ०.१६% वाढून प्रति बॅरल ७६.९० डॉलरवर व्यवहार करत असताना डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल ०.०४% घसरून प्रति बॅरल ७२.५० डॉलरवर व्यवहार करत आहे. यादरम्यान, देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत किंचित बदल झाला असून काही ठिकाणी तेल महागलं आहे तर काही ठिकाणी इंधन स्वस्त झालं आहे.

ITR Filing: घरबसल्या ऑनलाईन भरा तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस!
तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती
इंडियन ऑईलचे ग्राहक त्यांचा मोबाईलवर IndianOil ONE Mobile ॲप डाऊनलोड करुन जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. याशिवाय तुम्ही इंडियन ऑइलची वेबसाइट https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx वरही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सहज तपासू शकतात.

तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करा. तुम्हाला तुमच्या शहराचा कोड माहित नसल्यास तुमहाला तो इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here