Monsoon 2023 : केरळ किनार्यावरील ढगाळ वातावरणात वाढ या सर्व बाबींमुळं मान्सून आजचं दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार हे पाहावं लागणार आहे.
मान्सूनचं केरळमध्ये आगमन
हायलाइट्स:
अखेर मान्सूनचं आगमन झालं
भारतीय हवामान विभागाकडून मोठी अपडेट
महाराष्ट्रात कधी पोहोचणार?
मुंबई : भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. मान्सूनचं आजचं केरळमध्ये आगमन झालं असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. दरवर्षी १ जून रोजी मान्सूनचं आगमन केरळमध्ये होतं, यंदा तब्बल ७ दिवस उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज, ८जून २०२३ रोजी प्रवेश केला आहे. मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र आणि मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात सुरु आहे. केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन भाग, मन्नारचे आखातात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन १६ जूनला होईल असा अंदाज आहे. बातमी अपडेट होत आहे..
महत्वाचे लेख
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.