नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष (Rahul Gandhi) यांना यूपीए-२ च्या कार्याकालात देशाचे बनण्याची संधी चालून आली होती, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ता शक्तिसिंह गोहिल यांनी केला आहे. तत्कालिन पंतप्रधान (Dr. Manmohan Singh) यांनी अस्वस्थतेमुळे राहुल गांधी यांनी पंतप्रधान बनावे असा प्रस्ताव ठेवला होता. राहुल गांधी यांनी मात्र डॉ. मनमोहन सिंह यांचा प्रस्ताव स्वीकारण्या नकार दिला. आपण आपला कार्यकाल पूर्ण करावा, अशी विनंती त्यावेळी राहुल गांधी यांनी डॉ. सिंह यांना केली होती, असेही गोहिल पुढे म्हणाले. ( had proposed to become the next )

‘गांधी कुटुंबाने मोठेपणा दाखवला’

गांधी-नेहरू कुटुंबाने नेहमीच मोठेपणा दाखवला आणि व्यक्तीगत हितांपेक्षा पक्षाचे हीच मोठे मानले असे एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत गोहिल म्हणाले. त्यांनी अनेक संधी चालत आल्या असताना त्याग केला आणि सत्तेची कधीही लालसा धरली नाही. गांधी कुटुंब कधीही पदासाठी लोभी राहिलेले नाही, असे उदाहरणे सादर करत गोहिल म्हणाले.

राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे असी देशातील तरुण आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. मात्र, या बाबत निर्णय घेण्याचा हक्क काँग्रेस कार्यसमिती आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीला आहे, असेही गोहिल पुढे म्हणाले.

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या एका वक्तव्यावरून चर्चा सुरू असताना गोहिल यांचे हे वक्तव्य आले आहे. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीने करावे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या.

प्रियांका गांधी काय म्हणाल्या?

गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीने काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनावे या राहुल गांधी यांच्या विचाराचे समर्थन केले होते, असा दावा ‘इंडिया टुमॉरो’ या पुस्तकात दावा करण्यात आला आहे. या पुस्तकानुसार, पक्षाचा अध्यक्ष गांधी कुटुंबाचा नसला तरी देखील नवा अध्यक्ष आमचा बॉस असेल असे प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत. जे पक्षाचे नेतृत्व करू शकतील असे अनेक लोक पक्षात असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.

वाचा-

हे पुस्तक ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी प्रेसने नुकतेच प्रकाशित केले आहे. मात्र प्रियांका गांधी यांची ही मुलाखत एक वर्ष इतकी जुनी आहे, असा काँग्रेसचा दावा आहे. राहुल गांधी यांनी सन २०१९ मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता, त्या वेळीच प्रियांका गांधी यांनी हे वक्तव्य केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

वाचा-

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here