मुंबई : ‘आई-बापाने वाढवलं पण कांद्याने रडवलं’ अशी म्हण सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता ही म्हण बदलण्याची वेळ आली आहे. कारण, रक्ताचं पाणी करून आई-वडील आपल्या मुला-बाळांना वाढवतात. मात्र, समाजात वावरणारी नराधम वृत्तीची माणसं महिला, मुली आणि अल्पवयीन मुलींच्या आयुष्याची रांगोळी करताना दिसतात. खरंतर, राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत महिला, मुली, अल्पवयीन मुली कुठेच सुरक्षित नाही, असं म्हणण्याची वेळ आता आली आहे.

मुंबईच्या मरीन ड्राईव्ह इथं एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे इथून पुढे मुलीला एकटीला ठेवताना पालक १०० वेळा विचार करतील. उच्च शिक्षण घेऊन मोठी स्वप्न बाळगणाऱ्या अवघ्या १९ वर्षीय विद्यार्थीनीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पाहिलं तर मुलीचे शव अशा अवस्थेत होते की ज्याने पोलीस पथकही सुन्न झालं. या घटनेचा पुढे तपास सुरू झाला आणि असे काही सत्य समोर आले की यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Crime Diary: साहिल, प्रविण अन् अजय; प्रेमाचं जाळं खूनापर्यंत गेलं; साक्षी मर्डर केसची स्टार्ट टू एण्ड कहाणी
मुंबईच्या चर्चगेट परिसरातील मुलींच्या वसतिगृहात १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मंगळवारी सायंकाळी हा मृतदेह आढळून आला. खरंतर, मृत मुलीचा दिवसभर पत्ता न लागल्याने मरीन ड्राइव्ह पोलिसांना पाचारण करण्यात आले. यानंतर पोलिसांनी वसतिगृहात धाव घेतली तेव्हा मुलीचा खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता. खिडकीतून पाहिले असता पोलिसांना मुलीचे पाय दिसले. यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सगळेच हादरले.

बेडजवळ जमिनीवर पडला होता मृतदेह…

वसतिगृहातमध्ये खोलीत विद्यार्थिनीचा मृतदेह नग्न अवस्थेत आणि दोन खाटांमध्ये पडलेला असताना आढळून आला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे याच विद्यार्थ्याच्या मृतदेहाजवळ ओढणीही पडलेली होती. वसतिगृहात हत्या करण्यात आलेली मुलगी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असून वांद्रे इथल्या पॉलिटेक्निकची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली.

Crime Diary: प्रेयसीचा पती गावी येणार तोच प्रियकराचं प्लॅनिंग, युपीहून मुंबईत आला अन्…; कांदिवली व्यापाऱ्याच्या हत्येचं भयानक सत्य
पोलीस या सगळ्या घटनेचा तपास सुरू करणार तोच त्यांना आणखी एक फोन आला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ही बातमी आत्महत्येची होती. चर्नी रोड रेल्वे ट्रॅकवर कोणीतरी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण मृत ओमप्रकाश कनोजिया हा त्याच वसतिगृहात गार्ड म्हणून काम करायचा, जिथे पोलिसांना काही वेळापूर्वी एका मुलीचा मृतदेह सापडला होता. या मुलीची ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती.

सापडलेले दुवे जोडण्यात पोलिसांना यश…

आता पोलिसांनी सर्व विखुरलेले पुरावे जोडण्यास सुरुवात केली. मुंबईतल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात आधी एका मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडतो, यानंतर थोड्याच वेळात वसतिगृहाचा सुरक्षा रक्षक आत्महत्या करतो. मग नेमकं या मधल्या वेळेत काय झालं? पोलिसांच्या प्राथमिक संशयानुसार, सुरक्षा रक्षकाने आधी मुलीवर अत्याचार करत तिचा खून केला आणि नंतर चर्नी रोड इथं आपलं आयुष्य संपवलं. दरम्यान, ओमप्रकाश याने याआधी देखील या विद्यार्थिनीच्या खोलीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आल्याने वसतिगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Crime Diary : पत्नीच्या डोळ्यासमोर होतं सगळं पण फसली; पतीचा मित्र, रक्ताने माखलेले कपडे अन् धाड…धाड…धाड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास खुनाची घटना घडली. आरोपीने आधी मुलीवर अत्याचार केले आणि नंतर तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर रेल्वे पोलिसांना सकाळी ७ वाजता ओमप्रकाश कनोजिया यांचा मृतदेह चर्नी रोडच्या रेल्वे रुळाजवळ आढळून आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

ओमप्रकाशला धक्का मारून बाहेर काढलं…

या तरुणीच्या एका मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश याने याआधी देखील पहाटेच्या सुमारास तिच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याला खोलीत पाहून विद्यार्थिनीला धक्का बसला. तिने ओमप्रकाशाला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र तो बाहेर जात नसल्याचे पाहून तिने धक्का मारून त्याला बाहेर काढले होते. ही घटना नेमकी केव्हा घडली याची माहिती पोलिस घेत आहेत.

Crime Diary: रोज थोडं-थोडं करून पतीला जीव घेतला, पुरावाही नाही ठेवला; वाचा सायलंट किलर ‘सौ’ची कहाणी…

मृत मुलीच्या वडिलांची धक्कादायक माहिती…

ओमप्रकाश हा सन २००३ पासून या वसतिगृहात काम करीत होता. त्याचा भाऊ देखील येथेच सुरक्षारक्षक आहे. मात्र तो दोनच दिवसांपूर्वी गावी गेला होता. पोलिस त्याचीही चौकशी करणार आहेत. ओमप्रकाश सर्व तरुणीसोबत मैत्रिणीप्रमाणे वागायचा. मी ज्यावेळी मुलीला सोडण्यासाठी यायचो त्यावेळी तो, तुम्ही मुलीची काळजी करू नका. मी तिला काय हवे ते आणून देईन, असे सांगायचा. असा ओमप्रकाश मुलीची हत्या करेल हे माझ्या ध्यानीमनी नव्हते, असे विद्यार्थिनीच्या वडिलांनी म्हटले आहे.

मैत्रिणीने खोलीत बोलावले होते पण…

पोलिसांनी हॉस्टेलवरील इतर मुलींची चौकशी केली असता, यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री ११.३० वाजता मृत मुलीच्या मैत्रिणीने तिला फोन केला होता. तिने तू चौथ्या मजल्यावर एकटी आहेस, त्यामुळे माझ्या खोलीत ये असं सांगितलं. पण मुलीने खोलीत एकटं राहायला आवडतं असं सांगून मैत्रिणीला नकार दिला. खरंतर, तिने मैत्रिणीचं ऐकून तिच्या खोलीत राहण्यासाठी गेली असती तर कदाचित आज ती जिवंत असती.

Crime Diary: शेतात बाजरी चांगली उगवली पण अचानक आले पोलीस अन्…, पत्नीच्या मृतदेहासोबत पतीचा रक्तरंजित खेळ

सुरक्षा रक्षकाचा मोबाईल सापडला…

पोलिसांनी सांगितले की, सद्यस्थितीत त्या वसतिगृहात फक्त ४० ते ५० मुली राहत असून मृत मुलीसोबतही काही विद्यार्थिनी राहत होत्या. पण त्या सुट्टी लागल्याने आपल्या घरी गेल्याचं समोर आलं आहे. तर पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ५ मजली हॉस्टेलमध्ये ओमप्रकाशसह ३ सुरक्षा रक्षक राहत होते. पोलिसांनी सध्या कनोजियाचा मोबाईल जप्त केला असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

ओमप्रकाश तिच्या खोलीत घुसलेला, तिनं धक्के मारुन बाहेर काढलेलं; तरुणीच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here