कोल्हापूरमध्ये असे प्रकार होणं चांगलं नाहीच, असं शाहू छत्रपती म्हणाले. आता अलीकडच्या काळात दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा झालेलं आहे, एवढं यापूर्वी कधी झालेलं नव्हतं. याच्या मुळात जाऊन कारण काय आहे हे बघितलं पाहिजे. नेहमीच्या दृष्टिकोनातून न पाहता, मानसशास्त्रीय दृष्ट्या बघितलं पाहिजे, अशी मानसिकता का तयार होते, हे बघितलं पाहिजे, असं शाहू छत्रपती महाराजांनी सांगितलं. यापुढे अशा घटना घडू नयेत आणि सर्व समाज सलोख्यानं इथं राहावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं शाहू छत्रपती महाराजांनी म्हटलं.
कायदा व सुव्यवस्था ठेवायची जबाबदारी शासनाची असते, गृह खात्याची असते. त्यांनी यासंदर्भात रिपोर्ट बघितलं पाहिजेत. अशा घटना या पुढं होऊ नये, असं त्यांनी सांगितलं. संभाजीनगर, अहिल्यानगरला झालंय, नाशिकला झालंय. या सर्व घटनांचा एकमेकांशी संबंध आहे की वेगवेगळ्या आहेत, हे पाहिलं पाहिजे, असं शाहू छत्रपती म्हणाले.
आपण जे घडतंय ते पाहू शकतो, पण सरकारकडे यंत्रणा असते ते मूळ गोष्टीपर्यंत जाऊ शकतात. या प्रकरणी वेगवेगळ्या हालचाली झालेत का पाहायला पाहिजे, असं शाहू महाराज यांनी सांगितलं.
पोलिसांनी यापुढे सतर्क राहिले पाहिजे. जे झालंय ते झालंय नाही म्हणतात येत नाही. सीआयडी आणि यंत्रणांनी जास्त सतर्क व्हायला पाहिजे, असं शाहू महाराज म्हणाले. नेमकं या घटनांमागे काय आहे काय नाही, हे पाहायला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.
कालची जी घटना घडलीय ती पाहता यापूर्वी असं झाल्याचं मला आठवत नाही. मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना गरज वाटल्यास मला बोलवा असं सांगितलं होतं. मी दोन्ही समाजाला किंवा एका समाजाला मी असं वेगवेगळं मानत नाही. एकंदरीत सुव्यवस्था राहण्यासाठी आणि चांगल्या वातावरणात राहण्याच्या दृष्टीकोनातून मला बोलवा, असं सांगितल्याचं शाहू महाराज म्हणाले.