कोण आहेत राजेश मेहता?
बंगळुरूच्या सेंट जोसेफ येथून मेहता यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला तर त्यांना डॉक्टर बनायचे होते पण शालेय शिक्षण पूर्ण करूनही महाविद्यालयात प्रवेश न घेतले मेहता आपल्या वडिलांच्या व्यवसायात रुजू झाले. त्यांनी आणि त्यांचा भाऊ प्रशांतने वडिलांचा व्यवसाय वाढवण्याचा विडा उचलला. पण दोन्ही भावांना त्यांच्या वडिलांचा व्यवसाय वाढवण्यात भविष्य दिसत नव्हते.
बँकेत काम करणारा भाऊ बिपीनकडून त्यांनी १२०० रुपये कर्ज घेतले आणि त्यांनी चांदीचा व्यापार सुरू केला. त्यांनी चेन्नईहून दागिने आणले आणि राजकोटमध्ये विकले. नंतर त्यांनी गुजरातमधील घाऊक विक्रेत्यांना दागिने विकण्यास सुरुवात केली. दोघांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केला.
व्यवसायात यश प्राप्ती
चांदीचा व्यवसाय यशस्वी झाल्यानंतर त्यांनी १९८९ मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायात प्रवेश केला. त्यांनी बंगळुरूमध्ये त्यांच्या गॅरेजमध्ये सोन्याचे उत्पादन युनिट सुरू करून ब्रिटन, दुबई, ओमान, कुवेत, अमेरिका आणि युरोपमध्ये सोने निर्यात करण्यास सुरुवात केली. १९९२ पर्यंत त्यांचा व्यवसाय दरवर्षी २ कोटी रुपयांपर्यंत वाढला, तर १९९८ पर्यंत प्रति वर्ष १२०० कोटींचा व्यावर करू लागले. त्यानंतर त्यांनी शुभ ज्वेलर्स नावाने स्टोअर उघडले असून कंपनीची आता संपूर्ण कर्नाटकात अशी अनेक स्टोअर्स आहेत.
व्यवसायाचा विस्तार
कंपनीने जुलै २०१५ मध्ये स्विस रिफाइन्ड वाल्काम्बी ताब्यात घेतली. तर त्यांच्या स्वित्झर्लंड आणि भारतातही रिफायनरी आहे. राजेश मेहता हे कंपनीचे संस्थापक अध्यक्ष असून कंपनीच्या एकूण कामकाजाची जबाबदारी त्यांच्यावर असून ते वित्त आणि विपणन वर्टिकलचे प्रभारी देखील आहेत. २०१९ मध्ये फोर्ब्सने त्यांची एकूण संपत्ती १.५७ अब्ज डॉलर्स असण्याचा अंदाज वर्तवला होता, जो आजच्या दरांनुसार १२ हजार ९५० कोटी रुपये असेल. कंपनी भारत, स्वित्झर्लंड आणि दुबई येथून सोन्याचे दागिने आणि सोन्याची उत्पादने निर्यात करत असताना ६० पेक्षा जास्त देशांमध्ये उत्पादने निर्यात करते.