मुंबई : पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशनच्या शेअर्समध्ये काही महिन्यांपासून चांगली तेजी दिसून आली आहे. सहा महिन्यांत कंपनीचे शेअर्स ३८ टक्क्यांनी मजबूत झाले आहे. म्हणून मासिक आधारावर ते डिसेंबर २०२२ पासून सतत ग्रीन झोनमध्ये राहिले आहे. आज कंपनीचे शेअर्स बीएसईवर इंट्रा-डेमध्ये तो ८% वाढून ७८५.५० रुपयांवर पोहोचले. अशा परिस्थितीत शेअर्समध्ये गुंतवणुकीची चांगली संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Adani Group Stocks: अदानी शेअर्स गगनाला भिडले, नेमकी काय घडली घडामोड, तुम्हाला माहिती आहे की नाही?
पेटीएम शेअर्सबाबत तज्ज्ञांचे मत
पेटीएमची मार्च २०२३ च्या तिमाहीत अपेक्षित आर्थिक कामगिरीपेक्षा चांगली असल्यामुळे ब्रोकरेज दीर्घकालीन Paytm वर सकारात्मक आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांनी पेटीएमवर ९०० रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. मोतीलाल ओसवाल यांनी त्यांच्या अहवालात ठळकपणे नमूद केले आहे की एप्रिल-मे २०२३ मध्ये म्हणजे दोन महिन्यांत त्याचे सकल व्यापारी मूल्य (GMV) मजबूत राहिले आणि वर्षभरात ३५% वाढून २.६५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

रॉकेटच्या वेगाने धावत आहे एनर्जी स्टॉक, देतोय बंपर परतावा, गुंतवणूकदारांची झाली चांदी
पेटीएमच्या कर्ज वितरणात वाढ झाली आहे. पेटीएमने सध्या कर्जासाठी सात संस्थांसोबत भागीदारी केली असून आता चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आणखी तीन ते चार भागीदार जोडण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

सहा महिन्यांत ५०% हून अधिक परतावा
पेटीएमचे शेअर्स गुरुवारी बीएसईवर ७८५ रुपयांवर उघडले असताना दुपारी ३ वाजता पेटीएमचा एक शेअर ६.२१ टक्के उसळी घेते ७७२.१५ रुपयांवर व्यवहार करत होता. विशेष म्हणजे पेटीएमचे शेअर्स गेल्या ६ महिन्यांत ५०% हून अधिक वाढले आहेत.

गुंतवणूक करताय… हे लक्षात घ्या!

पेटीएमची आर्थिक स्थितीत
पेटीएमने ५ जून रोजी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की तिमाहीच्या पहिल्या दोन महिन्यांत त्यांचे सरासरी मासिक वापरकर्ते वार्षिक २४% वाढून ९२ दशलक्ष झाले आहेत. पेटीएमचा एकत्रित निव्वळ तोटा मार्च तिमाहीत ७६१.४ कोटी रुपयांवरून १६४.४ कोटी रुपयांवर घसरला तसेच परिचालन महसूल वार्षिक ५१.५ टक्क्यांनी वाढून २,३३४.५ कोटी झाला.

Bank Nifty Expiry Day: बँक निफ्टीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, नियमात झाला हा बदल
(नोट : शेअर बाजारातील गुंतवणूक धोक्याच्या अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही कंपनी किंवा स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी एक्स्पर्टचा सल्ला घ्या.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here