सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्यानंतर महाराष्ट्र व बिहारमधील भाजपचे नेते व मुख्यमंत्री यांनी आनंद व्यक्त केला होता. भाजप नेते ठाकरे सरकारवर तुटून पडले होते. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी ‘न्याय की अन्याय पर जीत’ अशी प्रतिक्रिया दिली होती. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून त्यांचा जोरदार समाचार घेतला आहे. ‘तपास करण्याचे अधिकार मुंबई पोलिसांचे आहेत. परंतु वादविवाद निर्माण होऊ नये यासाठी प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येत आहे, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. सीबीआय चौकशीच्या मान्यतेवरून ‘जितंमया’ करणाऱ्यांनी जरा सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणाकडेही एकदा पाहायला हवे. बिहार विधानसभेची निवडणूकच जिंकली अशा पद्धतीने ‘न्याय, सत्य’चा धोशा लावून नितीश कुमार बोलत आहेत, असा खोचक टोला शिवसेनेनं नितीशकुमारांना हाणला आहे.
वाचा:
‘सुशांत प्रकरणाचे रहस्य म्हणजे पाताळात दडवलेली कुपी आहे. ती कुपी फक्त बिहारचे पोलीस किंवा सीबीआयलाच शोधता येईल हा भ्रम आहे. सीबीआयने राज्यातील एखाद्या प्रकरणाचा तपास करायला हरकत नाही, पण राज्यांच्या अधिकारांवर हे आक्रमण आहे. बिहारमधील अनेक खून, हत्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला, पण त्यापैकी किती खरे आरोपी आतापर्यंत सीबीआय पकडू शकली? ब्रह्मेश्वर मुखियाने रणवीर सेना नावाची खासगी ‘फौज’ बनवली होती. त्याची हत्या होताच बिहारात दंगल उसळली. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. मुखियाचे खरे आरोपी कोणी पकडले असतील तर सांगावे. मुझफ्फरपूरचे नवरुणा हत्याकांड असेल नाहीतर सिवानमधील पत्रकार राजदेव रंजन हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. यापैकी कोणाचेही गुन्हेगार पकडले गेले नाहीत. त्यांच्या कुटुंबांवर जो अन्याय झाला त्यावर न्याय व सत्य यांनी विजय मिळविला नाही,’ याची आठवणही शिवसेनेनं दिली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times