लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल द ओव्हल मैदानावर सुरू आहे. मॅचच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी केली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचा फायदा झालेला दिसत नाही.आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने रोहित शर्माच्या निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. भारतीय संघाच्या निवडीवर बोलताना पॉन्टिंग म्हणाला, रोहितने आर. अश्विनला संघात घेतले नाही. चार जलद गोलंदाज आणि एक फिरकीपटू म्हणून जडेजाला संघात घेतले आहे. पॉन्टिंग गेल्या काही दिवसांपासून अश्विन हा एक्स फॅक्टर ठरू शकतो, असे म्हणत आहे. काल पहिल्या दिवशी जेव्हा हेड आणि स्मिथ आक्रमक फलंदाजी करत होते तेव्हा पॉन्टिंगचा अंदाज खरा ठरला.

IND vs AUS WTC Final 2023 LIVE: शमीच्यानंतर सिराजने दिला ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, कॅमरून ग्रीनची घेतली विकेट
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना समालोचन करणारा पॉन्टिंग म्हणाला, भारताने फक्त पहिल्या डावासाठी संघ निवडला आहे. ही त्यांची मोठी चूक आहे. अश्विन हा जडेजापेक्षा सर्वोत्तम गोलंदाज आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या संघात चार डावखुरे फलंदाज आहेत. अश्विन हा अशा फलंदाजांसाठी घातक गोलंदाज ठरू शकतो.

मनाची तयारी ठेवा, टीम इंडियाला पुन्हा उपविजेतेपद; ओव्हल मैदानावर पहिल्याच दिवशी पाहा काय झालं
मला धक्का बसला की त्यांनी अश्विनला बाहेर बसवले आहे. ऑस्ट्रेलियाकडे डाव्या हाताने खेळणारे फलंदाज जास्त आहेत. माझ्या मनात याबद्दल कोणतीही शंका नाही की जडेजा पेक्षा अश्विन सर्वोत्तम आहे. अश्विननंतर जडेजाने सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे हे देखील खरे आहे. मोठा निर्णय ठाकूर आणि उमेश यादव यांच्यात घ्यायचा होता. यात ठाकूरची बाजू अधिक मजबूत होती. कारण यामुळे शमी आणि सिराजला थोडा ब्रेक देता येऊ शकतो.

WTC Final Ind v Aus: IPLमधील अपमानाचा ट्रेविस हेडने असा घेतला बदला; भारतीय गोलंदाज हतबल
पॉन्टिंगने शमी, सिराज, ठाकूर आणि यादव यांच्या गोलंदाजीवर देखील टीका केली. सिराजने चांगली गोलंदाजी केली आणि उस्मान ख्वाजाला शून्यावर बाद केले. पण तेवढे पुरेसे नव्हते. जर भारताने खरंच चांगली गोलंदाजी केली असती तर ६० टक्के फुलर लेंथ असत्या तर २० टक्के गुड लेंथ टाकल्या असत्या.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ८५ षटकात ३ बाद ३२७ धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या दिवशी भारताने सुरुवातीच्या सत्रात हेड आणि कॅमरून ग्रीन यांना माघारी पाठवून चांगली सुरुवात केली आहे.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here