मिरारोड: मिरारोडच्या गीतानगर परिसरात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी संध्याकाळी उघडकीस आला. या घटनेत गाठली गेलेली क्रौर्याची परिसीमा पाहून मुंबईत प्रचंड खळबळ उडाली आहे. येथील गीता आकाशदिप इमारतीच्या जे विंगमध्ये ही घटना घडली. याठिकाणी भाड्याने राहणाऱ्या मनोज साने याने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाचे २० तुकडे केले. मनोज याच्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी प्रवेश केला तेव्हा तेथील दृश्य अंगावर काटा आणणारे होते. हे सगळे समोर येण्यापूर्वीच मनोजच्या शेजारच्यांना या फ्लॅटमध्ये काहीतरी अघटित घडलंय, याचा सुगावा लागला होता.

VIDEO: पोलिसांच्या हाती पिशव्या, त्यात बॉडीचे तुकडे, कुत्र्यांचा भेसूर आवाज, अंगावर काटा आणणारं दृश्य

मनोज आणि सरस्वती हे दोघे गेल्या तीन वर्षांपासून याठिकाणी राहत होते. मनोज हा बोरिवली येथील रेशनच्या दुकानात कामाला होता. सरस्वती वैद्य यांची हत्या झाली त्यादिवशीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. दोघांच्या आरडाओरड्याचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता. मनोज हा सरस्वती यांना मारत होता. तेव्हा एका शेजाऱ्याने जाऊन दरवाजाही वाजवला, मात्र कोणीही दरवाजा उघडला नाही. काहीवेळाने दोघांच्या भांडणाचा आवाज बंद झाला. यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता मनोज साने तयार होऊन खोलीच्या बाहेर पडला. त्याच्या डोक्यावर हेल्मेट होते आणि पाठीवर काळ्या रंगाची बॅग होती. त्यावेळी मनोजच्या शेजारच्या फ्लॅटमधील लोक घराबाहेरच उभे होते. मनोजने दरवाजा उघडताच त्यांना प्रचंड घाणेरडा वास आला. त्यानंतर मनोज खोलीला कुलूप लावून निघून गेला. सरस्वती वैद्य या घरात असताना मनोजने घराला कुलूप का लावले, असा प्रश्न शेजाऱ्यांना पडला. एरवी सरस्वती या घराबाहेर यायच्या तेव्हा त्या शेजारच्यांना हात दाखवाच्या. मात्र, रविवारपासून त्या कोणालाच दिसल्या नाहीत. तेव्हापासून दोन-तीन दिवस मनोजच्या फ्लॅटमधून घाणेरडा वास येत होता. बुधवारी दुपारी साडेचार वाजता मनोज घराबाहेर पडला तेव्हा शेजाऱ्याने मनोजला तुमच्या घरातून घाणेरडा वास येत असल्याचे सांगितले. तेव्हा मनोज घाबराघुबरा झाला होता. मी कसला वास येतो ते पाहतो, असे तो म्हणाला. मी आता रात्री साडेदहा वाजता घरी येईन तेव्हा पाहून घेईन, असे सांगून मनोज तिथून निघून गेला. अखेर आम्ही पोलिसांना बोलवून खोलीच कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला, अशी माहिती शेजारच्या महिलांनी दिली.

दोन-तीन दिवसांपासून मनोज कुत्र्यांना खायला घालत होता, ते वाक्य ऐकताच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली

पोलिसांनी मनोज साने याला काल अटक केली होती. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी मनोज सानेला ठाणे न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने मनोजला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता मनोजच्या चौकशीत आणखी कोणती माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मनोज आणि सरस्वती हे दोघे २०१४ पासून एकत्र राहत आहेत. या दोघांचे लग्न झाले नव्हते. यापूर्वी दोघेही बोरिवली परिसरात राहायला होते. याठिकाणी मनोज रेशनच्या दुकानात कामाला होता. तिथेच या दोघांची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते आणि पुढे या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.

चालकाचं व्हिडिओ पाहत कार रिव्हर्स मारणं ४ वर्षाच्या चिमुकलीच्या जीवावर बेतलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here