जळगाव : गाडीच्या चावीवरून झालेल्या वादातून दोघांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अविनाश निंबा अहिरे (वय-३५, रा. कुसुंबा ता. जळगाव) असं मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात तालुका पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे अविनाश अहिरे हा पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास असून तो एका कंपनीत टेक्निशियन म्हणून नोकरीला होता. मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अविनाश हा त्याचा आतेभाऊ महेश सोनवणे याच्यासोबत त्याच्या (एमएच १९ ईए ०४५१) क्रमांकाच्या कारने बांभोरी रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. तेव्हा याठिकाणी अविनाशचा मित्र दीपक प्रकाश पाटील हा अविनाश याची दुचाकी घेऊन जेवणासाठी आला. जेवण करत असताना अविनाश व दीपक यांच्यात किरकोळ वाद झाला. यानंतर दीपक तिथून निघून गेला. जेवण आटोपल्यानंतर महेश सोनवणे व अविनाश अहिरे हे दोघे कारने खोटेनगर स्टॉप येथे आले.

बांगर हमारो जिवेती प्यारो, नवरदवाने आमदारासाठी गायलं गाणं

भाजपचे मिशन लोकसभा सुरु, ४८ तगड्या नेत्यांवर मतदारसंघांची जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

वाद विकोपाला गेला, दोघांनी पकडून ठेवले, अन् एकाने सपासप वार केले

साडेनऊ वाजताच्या सुमारास दीपक खोटेनगरात आला, दुचाकीची चावी मागण्यावरुन त्याचा अविनाशसोबत पुन्हा वाद झाला. यावेळी दीपक व अविनाश या दोघांच्या ओळखीचे साहिल खान व अमोल गवई हे उपस्थित होते. दोघांनी भांडणात मध्यस्थी करत अविनाश याला उद्देशून माझा मित्र दीपक याला का शिव्या देतो आहेस, असे सांगितले. यावर अविनाश हा दोघांना उद्देशूतन तुमचा भांडणात बोलण्याचा काहीच संबंध नाही, तुम्ही आमच्या भांडणात नाक खुपसू नका, चला निघा इथून, असे बोलला. हा बोलण्याचा राग आल्याने वाद विकोपाला गेला. या वादात दीपक पाटील व त्याचा मित्र साहील खान यांनी अविनाशला धरुन ठेवले, तर दीपकचा दुसरा मित्र अमोल गवई याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने अविनाशच्या पोटात पाच ते सहा वेळा वार केले. या घटनेत अविनाश हा गंभीर जखमी झाला होता. तसेच त्याच्या चारचाकीच्याही काचा फोडून नुकसान करण्यात आले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अविनाश याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, याप्रकरणी मयत अविनाश याचा मित्र महेश सोनवणे याच्या फिर्यादीवरुन दीपक प्रकाश पाटील (रा. संत मिराबाई नगर, पिंप्राळा, जळगाव), साहिल खान, व अमोल गवई या तिघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर रात्रीच पोलिसांनी दीपक पाटील याला ताब्यात घेतले. त्यानंतर रात्रभर शोध मोहीम राबवत साहिल खान व अमोल गवई याला देखील अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मोहन सायकर हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here