लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील इंदिरानगर भागात एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्याच घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप या अल्पवयीन मुलीच्या आईने केला आहे. तिने शाहिद नावाच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या हत्येला आत्महत्येसारखं भासवण्यासाठी शाहिदने आपल्या मुलीचा मृतदेह फासावर लटकवल्याचं आईने सांगितलं आहे.

सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे. ही घटना बुधवारची असल्याची महिती आहे. आरोपीच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे समोर आले आहेत. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर त्याने अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या केली. त्याने मुलीच्या डोक्यात हातोड्याने वार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर ही घटना आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठीच त्याने मुलीचा मृतदेह पंख्याला लटकवल्याचीही चर्चा आहे.

मिरारोड मर्डर केस; फरशीवर केसांची वेणी, बेसिनमध्ये रक्ताने भरलेल्या बादल्या, प्रत्यक्षदर्शीने सारं सांगितलं
आरोपी घरातून पळताना दिसला

तरुणीच्या नातेवाईकांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसात दिलेल्या तक्रारीत नातेवाईकांनी म्हटले आहे की, आरोपी अनेक दिवसांपासून त्यांच्या मुलीचा छळ करत होता. ती घरात एकटीच होती. दरम्यान, त्याने घरात घुसून तरुणीवर बलात्कार करून तिची हातोड्याने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. मुलीच्या आईने सांगितले की, बुधवारी दुपारी ती कामावरून परतली तेव्हा आरोपी घरातून पळताना दिसला. त्यांनी त्याला पकडण्याचाही प्रयत्न केला. पण, तो हातात आला नाही.

पोलिसांच्या हाती पिशव्या, कुत्र्यांचा भेसूर आवाज.. मीरारोडमध्ये थरकाप उडवणारी घटना

डीसीपी उत्तर कासिम अब्दी यांनी सांगितले की, मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, जेव्हा ती घरात पोहोचली तेव्हा मुलीचा मृतदेह स्कार्फच्या साहाय्याने फासावर लटकलेला होता. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला ताब्यात घेतले आहे. मुलीने गळफास लावून घेतल्याचं त्याने चौकशीत सांगितले.

Crime News: सुटकेसमध्ये २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह, हत्येची पद्धत पाहून पोलिसही हादरले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here