रोम : एका इटालीतल खासदाराने भरलेल्या संसदेत आपल्या मुलाचे स्तनपान केले. या बद्दल महिला खासदाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. गिल्डा स्पोर्टिएलो असे या इटालियन महिला खासदाराचे नाव आहे. गिल्डा स्पोर्टिएलो बुधवारी संसदेत आपल्या नवजात बाळाला स्तनपान देणाऱ्या इटलीतील पहिल्या राजकारणी ठरल्या. यावेळी त्यांनी सार्वजनिक प्रशासनाशी संबंधित विधेयकावरही मतदान केले. त्यानंतर सहकारी खासदारांच्या टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी आपल्या नवजात मुलाला दूध पाजले. चेंबर ऑफ डेप्युटीज, इटलीच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह, पुरुष प्रधान मानले जाते. अशा परिस्थितीत गिल्डा स्पोर्टिएलो यांचे हे पाऊल अत्यंत धाडसी असल्याचे सांगितले जात आहे.

मुलांना संसदेत आणण्यासाठी दिला लढा

गिल्डा स्पोर्टिएलो या डाव्या विचारसरणीच्या फाईव्ह-स्टार मूव्हमेंट पार्टीच्या सदस्या आहेत. या त्याच खासदार आहेत ज्यांनी संसदेच्या अधिवेशनात महिलांना त्यांच्या मुलांना सांभाळण्याची परवानगी द्यावी यासाठी लढा दिला होता. संसदीय अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी जॉर्जियो मुले म्हणाले की, सर्व पक्षांच्या पाठिंब्याने गिल्डा स्पोर्टिएलो यांनी स्तनपान करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी गिल्डा स्पोर्टिएलोच्या नवजात बाळाला, फेडेरिकोला शुभेच्छा दिल्या. स्पीकरने फेडेरिकोला दीर्घ, मुक्त आणि शांत आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. आता आपण शांत राहू असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा मृत्यू; घराच्या विहिरीत सापडला मृतदेह, शहरात एकच खळबळ
स्पोर्टिएलो या महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या आहेत

स्पोर्टिएलो यांनी या घटनेनंतर सांगितले की, अनेक स्त्रिया वेळेआधीच आपल्या बाळाला स्तनपान देणे थांबवतात. ते हे त्यांच्या आवडीनुसार करत नाहीत, परंतु त्यांना त्यांच्या कामावर परत जाण्यास भाग पाडले जाते. जर इटलीच्या सर्वोच्च संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मुलांची काळजी घेण्याची परवानगी दिली, तर कोणत्याही व्यावसायातील महिलेला या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ शकणार नाही, असेही त्या पुढे म्हणाल्या.

WTC Final : येताच दोन चौकार आणि शतकही ठोकले; स्टीव्ह स्मिथने तोडले अनेक विक्रम, विराट कोहलीलाही मागे सारले
कामाच्या ठिकाणी मुलांना स्तनपान देण्याचा मुद्दा केला उपस्थित

ला रिपब्लिकाशी बोलताना स्पोर्टिएलो म्हणाल्या की, आपले कार्य संपूर्ण इटलीमध्ये कार्यस्थळांना प्रेरणा देईल. या मुळे काम करणाऱ्या मातांना त्यांच्या मुलांची काळजी घेणे सोपे होईल. गेल्या वर्षी संसदीय नियम समितीने महिला खासदारांना त्यांच्या मुलांसह चेंबरमध्ये जाण्याची आणि एक वर्षाची होईपर्यंत त्यांना स्तनपान करण्याची परवानगी दिली होती. जॉर्जिया मेलोनी यांनी ऑक्टोबरमध्ये इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. तथापि, इटलीचे दोन तृतीयांश खासदार पुरुष आहेत.

दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन, कायम आठवणीत राहील त्यांचा आवाज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here