पुणे : मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट झाली. कोल्हे आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यामुळे पुणे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांची उमेदवारी शरद पवार यांनी जवळपास निश्चित केली असून इकडे कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचे वसंत मोरे यांनी आधी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. मात्र आज अचानक अमोल कोल्हे हे वसंत मोरे यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचे मिशन लोकसभा सुरु, ४८ तगड्या नेत्यांवर मतदारसंघांची जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी
अमोल कोल्हे हे गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलेच चर्चेत आले आहे. वसंत मोरे हे नेहमीच त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. आजची त्यांची भेट ही सदिच्छा मानली जात आहे. अमोल कोल्हे यांचे कात्रज परिसरात कार्यक्रम असल्याने त्यांनी वसंत मोरे यांची भेट घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.
राजकारणासाठी औरंगजेब ही भाजपची गरज, खासदार संजय राऊत यांची टीका
अमोल कोल्हे आणि वसंत मोरे यांची भेट ही राजकीय घडामोडींसाठी असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांच्या अचानक भेटीने पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here