हे प्रकरण जिल्ह्यातील केळखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपुरा काजी गावातील आहे. गावातील बौर तलावाजवळ मानवी अवयव पडून असल्याची माहिती ग्रामस्थांकडून पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. याठिकाणी पथकाला तलावाजवळ मानवी शरीराचे दोन छाटलेले पाय आणि पायाचा पंजा आढळून आला. तत्काळ फॉरेन्सिक आणि डॉग स्वॅक्ड टीमलाही पाचारण करण्यात आले. यानंतर परिसरात शरीराच्या इतर अवयवांचा शोध घेण्यात आला.
गावातील रहिवासी जोगिंदर कौर या दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. ती तिचे पाच सख्खे भाऊ आणि एका सावत्र भावासोबत गावात राहत होती. जोगिंदर या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे, त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही, अशी माहिती त्यांच्या भावांनी दिली.
बेपत्ता झालेल्या महिलेच्या घराजवळ आहे तलाव
ज्या तलावाजवळ दोन पाय आणि एक पायाचा पंजा सापडला तो जोगिंदरच्या घरापासून १०० मीटर अंतरावर आहे. पायाला गुंडाळलेला पायजमाही सापडल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे. पीडितेच्या भावांना तो पायजामा दाखवण्यात आला आहे, जेणेकरून तो जोगिंदरचा आहे की अन्य कोणाचा हे ओळखता येईल.
या प्रकरणाची माहिती देताना सीओ बाजपूर भूपेंद्र सिंह भंडारी सांगतात की, मानवी शरीराचे अवयव सापडल्यानंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम, श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यासोबतच एसपी काशीपूरही घटनास्थळी पोहोचले. दोन पाय तर एका पायाचा पंजा सापडला आहे. मृतदेहाचे उर्वरित अवयव शोधण्यासाठी परिसरात ४ जवानांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. तलावातही शरीराच्या अवयवांचा शोध घेतला जात आहे.