पुणे (इंदापूर) : पुण्यातील इंदापूर तालुक्यातील मदनवाडीजवळील भकासवाडी येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. अखेर या महिलेचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं भिगवण पोलिसांच्या तपासात उघड झाले असून या प्रकरणी भिगवण पोलिसांनी एकाला अटक केली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. काळु उर्फ दादा श्रीरंग पवार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नांव आहे.

मंगळवारी (दि. ६) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मदनवाडी गावच्या हद्दीत जेवण आणण्यासाठी गेलेल्या एका ४० वर्षीय महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणाचा भिगवण पोलिसांनी कसून तपास करत या घटनेचा उलघडा केला आहे.

राजकारणासाठी औरंगजेब ही भाजपची गरज, खासदार संजय राऊत यांची टीका
सदर मृत महिला ही आरोपीकडे “माझा आणि माझ्या मुलांचा सांभाळ करणार का नाही? शिवाय दिलेले पैसे परत दे”, असा तगादा लावत होती. यातून चिडलेल्या श्रीरंग पवार याने मारहाण करून त्या महिलेचा गळा दाबून तिची हत्त्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या महिलेला त्याने पेटवून दिले होते. मृत महिलेची मुलगी टिना कल्याण काळे हिच्या फिर्यादीवरुन या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक सुभाष रूपनवर, विनायक दडस पाटील, रूपेश कदम, पोलीस अंमलदार सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने हसीम मुलाणी यांच्या पथकाने केली.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here