नाशिक: शहरातील ध्रुवनगर परिसरात राहणाऱ्या अल्पयीन मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप मुलाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलाने बुधवारी (दि. ७) दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेत जीवन यात्रा संपवली आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलाची आई घरात असतानाच त्याने गळफास घेतला. जेव्हा मुलाने गळफास घेतल्याची बाब त्यांंच्या लक्षात आली तेव्हा कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे उपचारापूर्वी वैद्यकीय सूत्रांनी त्याला मृत घोषित केले. अल्पवयनी मुलाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचे कारण समजू शकले नाही.

१२ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी
अल्पवयीन मुलाला एक छोटी बहीण असून तो नुकताच नववी पास होऊन दहावीच्या वर्गात गेला होता. अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवन यात्रा संपवल्याने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

नाशिक शहरात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असून आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी ठाणे येथील रहिवासी असलेला सिद्धेश सुरेश कदम (वय २५) हा युवक नाशिक शहरात कामानिमित्त आला होता. नाशिक रोड येथील रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये मुक्कामी थांबलेला होता. यावेळी त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरी घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या नवनाथ नगर भागात घडली आहे. ललित मनोज रंगारी (वय ३८) या व्यक्तीने मंगळवारी आढण्यात कारणातून आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला तार बांधून गळफास लावून घेतला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिरारोड मर्डर केस; फरशीवर केसांची वेणी, बेसिनमध्ये रक्ताने भरलेल्या बादल्या, प्रत्यक्षदर्शीने सारं सांगितलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here