म. टा. वृत्तसेवा, नागपूर : कोणीतरी प्राध्यापक धीरज राणे यांना ब्लॅकमेल करीत होते. याबाबत धीरज यांनी पत्नी डॉ. सुषमा यांना सांगितले. या कारणावरून दोघेही गत एक महिन्यापासून तणावात होते. यातूनच सुषमा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज यांना कोणीतरी ब्लॅकमेल करीत होते. याबाबत धीरज यांनी पत्नीला सांगितले. दोघांनी या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र मार्ग निघाला नाही. त्यामुळे दोघे तणावात राहायला लागले. बदनामीच्या भीतीने राणे दाम्पत्याने ही बाब कोणालाही सांगितली नाही. राणे दाम्पत्याच्या स्वभावातही बदल झाला. अखेर डॉ. सुषमा यांनी टोकाचा निर्णय घेतला. सोमवारी रात्री पती धीरज, मुलगा ध्रुव व मुलगी वण्या यांना जेवणातून गुंगीचे औषध दिले. तिघेही बेशुद्ध झाले. त्यानंतर इंजेक्शन देऊन तिघांना ठार मारले. रात्रभर सुषमा या तिघांच्या मृतदेहाजवळ बसून होत्या. मंगळवारी सकाळी त्या बाहेर गेल्या. त्यांनी फुले आणली. फुले तिघांच्या मृतदेहांवर वाहिले. त्यानंतर पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली. वृत्त लिहिपर्यंत चौघांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आला नव्हता. तूर्त कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

सकाळी ११नंतर घेतला गळफास

डॉ. सुषमा या सकाळी ११ वाजता धीरज यांच्या आत्या प्रमिला यांच्यासोबत बोलल्या. प्रकृती बरी नाही. झोपायचे आहे, असे सांगून त्या खोलीत गेल्या. त्यानंतर डॉ. सुषमा यांनी गळफास घेऊन केली, अशी माहिती समोर आली आहे. सुषमा, धीरज व मुले झोपले असतील त्यामुळे प्रमिला यांनी त्यांना जागविले नाही. दुपारी २ वाजल्यानंतरही ते न उठल्याने प्रमिला यांनी धीरज व सुषमा यांना आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडल्यानंतर चौघांचे मृतदेह आढळले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here