नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या यादव नगर परिसरात दोन अज्ञात आरोपींनी घरात घुसून दोन लाखांची रोकड लंपास केली. मात्र, त्याचवेळी घरमालक घरात पोहोचला, त्यानंतर आरोपीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून घरमालकाला खोलीत कोंडून तिथून पलायन केले. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५७ वर्षीय कमल अडवाणी हे यादव नगर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार हे सेवानिवृत्त लिपिक असून काही दिवसांपासून ते घरी एकटेच राहत होते. त्यांची पत्नी आपल्या मुलीकडे लंडनला गेली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार राणी दुर्गावती चौकात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते आणि सुमारे ३५ मिनिटांनी ते घरी परतले.
राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे मनसे नेते वसंत मोरेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच!
त्याचवेळी घरी पोहोचल्यावर त्यांना खोलीचा दरवाजा तुटलेला दिसला. तक्रारदार आत जाऊ लागले तेव्हा हेल्मेट घातलेले दोन आरोपी खोलीतून बाहेर येताना त्यांना दिसले. त्यांनी प्रतिकार करत असताना आरोपींनी त्यांचे पिस्तूल काढून फिर्यादीच्या डोक्यावर ठेवले आणि त्यांना गप्प राहण्यास सांगितले. आरोपींनी कमल अडवाणी यांना ढकलून खोलीत कोंडून तेथून दुचाकीवरून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना दोन अज्ञात आरोपी दुचाकीवरून पळताना दिसले. आरोपींनी घरातून सुमारे दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेली होती. मात्र, घरमालक वेळेवर घरी आल्याने आरोपींचे सोन्याचे दागिने चोरीला चुकले होते.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींनी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या प्रेमनगर परिसरातून एक वाहन चोरून त्याच वाहनाचा वापर करून गुन्हा केल्याचे उघड झालं आहे. सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून मिळालेल्या माहितीचा आधारे पोलीस या दोन अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे.

VIDEO: थोडावेळ मैदानात आला अन् कांगारूची बँड वाजवून गेला; रॉकेट थ्रो मारून त्रिफळा उडवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here