बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यातील चिंचपूर गावात एका शेतकऱ्याने शक्कल लढवत मिरचीच्या शेतात चक्क गांजाची लागवड केली होती. या घटनेची गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळतात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पंचांसमोर पाहणी करून गुन्हा दाखल केला आहे.

आजकाल पैसा कमवण्यासाठी कोणती शक्कल लढवली जाईल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेलं चिंचपूर गावात घडली. येथील सतपाल ज्ञानबा घुगे या शेतकऱ्यांने पैसा कमवण्याच्या नादात आपल्या मिरचीच्या शेतात सोप्या पद्धतीने गांजा पेरला आणि या गांजाची सोप्या पद्धतीनेच विक्री करू लागला. यामध्ये पैसा अधिक मिळत असल्याने थोडं थोडं करत त्याने मिरचीच्या पूर्ण शेतात गांजाची लागवड केली. याचं गोष्टीची माहिती गोपनीय सूत्रांकडून सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या टीमला मिळाली होती.

१२ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी
या टीमने सापळा रचत या शेताच्या ठिकाणी धाड मारली. तेव्हा या ठिकाणी सहा ते साडेसहा फुटाची नऊ झाडे गांजाची आढळून आली. यात तब्बल २४ किलो ८३० ग्रॅम इतका गांजा आढळून आला. याची किंमत १ लाख २४ हजार असल्याची माहिती आहे. हा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र, या शेतात हिरवीगार सहा ते साडेसहा फुटाची ही गांजाची झाडं आतापर्यंत कोणाच्या कशी लक्षात आली नाही, असा प्रश्न आहे. सात ते आठ झाड लावलेली असून अनेक छोटी मोठी रोपे देखील या शेतकऱ्यांनी इतरत्र लावली होती.

अब्दुल सत्तारांकडे शेतकऱ्याची थेट गांजा लागवडीची मागणी; कृषी मंत्र्यांच्या भुवया उंचावल्या

हा सगळा माल पोलिसांनी जप्त करत शेतकऱ्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. सर्वत्र कठोर निर्बंध असताना देखील हा शेतकरी गांजाची शेती करत असल्याने इतरांवरही याचा चाप बसावा यासाठी या शेतकऱ्यावर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या घटनेनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिरारोड मर्डर केस; फरशीवर केसांची वेणी, बेसिनमध्ये रक्ताने भरलेल्या बादल्या, प्रत्यक्षदर्शीने सारं सांगितलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here