पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना काय आहे हे समजल्यानंतर कोणीही त्यावर विचार करत बसेल असे हे प्रकरण आहे. गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलच्या खोलीत असताना सीआरपीएफ जवानाचा प्रायव्हेट पार्ट त्याच्या पत्नीने चाकूने कापून टाकला. दोन दिवसांपूर्वी दोघांनी कोर्टात लग्न केले होते. जवानाचा ६० टक्के प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला आहे. छत्तीसगडमधील सुकमा येथे तैनात जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर पीएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना बुधवारची आहे. ही तरुणी पाटण्यात राहते आणि शिकते. ती दरभंगा येथील रहिवासी आहे. जवान हा मूळचा सीतामढीचा रहिवासी आहे. दोघेही जवळचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे.गांधी मैदान पोलिसांनी पीएमसीएचमध्ये जाऊन सीआरपीएफ जवान सूर्यभूषण कुमार यांचा जबाब नोंदवला आहे. पोलीस अधिकारी सुनील कुमार राजवंशी यांनी सांगितले की, पोलिसांनी जवानाच्या पत्नीला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच जवानाची भावजय आणि इतर नातेवाईक पीएमसीएचमध्ये पोहोचले. सूर्यभूषण कुमार यांनी सांगितले की, दोघांनी ५ जून रोजीच कोर्टात लग्न केले आहे.

आमच्या धर्माच्या मुलीला फसवतो का?; सोलापुरातील महाविद्यालयीन तरुणाला १५ जणांची मारहाण, लव्ह जिहादचा संशय
सीआरपीएफ जवानाचे लग्न दुसऱ्या ठिकाणी झाले होते निश्चित

सीआरपीएफ जवानाने आपल्या जबाबात म्हटले आहे की, ‘मी माझ्या प्रेमिकेवर तीन वर्षांपासून प्रेम करत आहे. २३ जून रोजी माझे लग्न दुसऱ्याच मुलीसोबत निश्चित झाले होते. ही तरुणी शिवहर येथील रहिवासी आहे. २३ जून रोजी होणाऱ्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मैत्रिणीला याची माहिती मिळाली. तिने फोन करून पाटण्याला ये नाहीतर मी आत्महत्या करेन अशी धमकी तिने मला दिली.

Gilda Sportiello: संसदेत महिला खासदाराने केले आपल्या मुलाचे स्तनपान, सहकाऱ्यांनी वाजवल्या टाळ्या
तिच्या धमकीनंतर ३ जून रोजी मी सुकम्याहून पाटणाला पोहोचलो आणि हॉटेलमध्ये थांबलो. ५ जून रोजी तिने माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. ती म्हणाली की मी तुझी बायको होईन, नाहीतर मरेन. मग ५ जून रोजी तिच्यासोबत नगर न्यायालयात गेलो आणि तेथे दोघांनी लग्न केले. त्यानंतर आम्ही दोघेही हॉटेलमध्ये थांबलो.’

ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा मृत्यू; घराच्या विहिरीत सापडला मृतदेह, शहरात एकच खळबळ
अचानक पिशवीतून चाकू काढून प्रायव्हेट पार्ट कापला

सूर्यभूषण कुमार यांनी सांगितले की, मी इनरवेअर घातला होता. दरम्यान, ज्या मुलीशी तुझे लग्न ठरले आहे, तिच्याशी तुमचे नाते संपवून टाका, असे ती म्हणाला. जर तुम्ही असे केले नाहीत तर मी तुम्हाला मारून टाकीन किंवा माझा जीव देईन. यानंतर सूर्यभूषण याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिने जवळच ठेवलेल्या पिशवीतून चाकू काढून प्रायव्हेट पार्ट कापला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here