दुसरे सत्र – धावा ८४, षटके २२.३, विकेट ५
तिसरे सत्र – धावा ११४, षटके २८, विकेट ३
टॉप- ४ मध्ये कोणीही टिकले नाही
स्मिथ आणि हेड असताना ज्या खेळपट्टीवर फलंदाजी सोपी होती, त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना संघर्ष करावा लागला. रोहित शर्मा (१५ धावा) आणि शुंभन गिल (१३ धावा) यांनी पहिल्या सहा षटकात ३० धावांची भर घालत भारताची सकारात्मक सुरुवात केली. मात्र, दोघेही समान धावसंख्येवर बाद झाले. गिलने स्कॉट बोलँडचा एक आत येणारा समजला नसल्याने तो सोडून दिला. चेंडू त्याच्या स्टंपच्या पलीकडे गेला. त्या चेंडूने स्टंप उडवले.
अशाच प्रकारे चेतेश्वर पुजाराही (१४ धावा) कॅमेरून ग्रीनचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संयमी गोलंदाजीसमोर विराट कोहली (१४ धावा) ही फार काळ टिकू शकला नाही. भारताकडून फक्त रवींद्र जडेजाने (४८ धावा, ५१ चेंडू) प्रतिआक्रमण केले. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला.
८७ वर्षे जुना विक्रम मोडला
पहिल्या दिवशी स्मिथ ९५ धावांवर नाबाद होता. मोहम्मद सिराजने टाकलेल्या दिवसाच्या पहिल्याच षटकात सलग दोन चेंडूंवर चौकार मारून त्याने आपले ३१ वे कसोटी शतक पूर्ण केले. मोहम्मद शमीच्या चेंडूवर चौकार मारून हेडने कारकिर्दीत चौथ्यांदा कसोटीत १५० धावांचा टप्पा गाठला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत स्मिथ आणि हेड जोडीने २५१* धावांची भागीदारी केली होती.
दुसऱ्या दिवशी त्यांची भागीदारी २६७ धावांपर्यंत पोहोचली तेव्हा नवा विक्रम रचला. स्मिथ आणि हेड या जोडीने ओव्हलवर चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीचा ८७ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. इंग्लंडच्या वॅली हॅमंड आणि थॉमस वर्थिंग्टन यांनी १९३६ मध्ये ओव्हल येथे भारताविरुद्ध चौथ्या विकेटसाठी २६६ धावांची भागीदारी केली होती. स्मिथ आणि हेड जोडीने ६७ षटकात २८५ धावांची भागीदारी केली.