भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. आता यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने हा २५ सेकंदांचा व्हिडिओ बनवल्याचा दावा केला जात आहे. एसी कोचमध्ये साफसफाई केली जात असून बहुतांश प्रवासी पहुडलेले आहेत किंवा बसलेले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, अचानक मोठा आवाज होतो आणि ट्रेनमध्ये अंधार होतो. यानंतर एकच खळबळ उडालेली जाणवत आहे. मात्र महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने या कथित व्हिडिओंची पडताळणी केलेली नाही.

असा दावा केला जात आहे की, एसी कोचमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने अपघाताच्या काही सेकंद आधी हा व्हिडिओ बनवला होता. एक सफाई कर्मचारी ट्रेनच्या डब्यात फरशी साफ करताना दिसत आहे. सीटवर एक महिला झोपलेली दिसते आणि तिच्या शेजारी एक प्रवासी बसलेला दिसतो. दरम्यान, जोराची टक्कर बसल्याचा आवाज येतो आणि ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला.

अभिमानास्पद! एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच, सासवड-जेजुरी मार्गावर महिलेने चालवली बस, पाहा व्हिडिओ
विद्यार्थी शाळेत यायला घाबरतात

दुसरीकडे तात्पुरते शवागार बनलेल्या बहनगा येथील शाळेतील विद्यार्थी वर्गात जायला घाबरत आहेत. या शाळेच्या आवारात रेल्वे अपघातानंतर मृतदेह ठेवण्यात आले होते. अपघातानंतर लगेचच ६५ वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीत कफनात लपेटलेले मृतदेह ठेवण्यात आले होते. विद्यार्थी आता या शाळेत येण्याचे टाळत असून शाळा व्यवस्थापन समितीने (एसएमसी) ही इमारत खूप जुनी असल्याने ती पाडण्याची विनंती राज्य सरकारकडे केली आहे.

WTC फायनलमध्ये टीम इंडियाची स्थिती दयनीय, दोन दिवसांच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड
बहनगा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिला स्वेन यांनी सांगितले की, ‘विद्यार्थी घाबरले आहेत. शाळेने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आणि काही विधी करण्याचे नियोजन केले आहे. शाळेतील काही ज्येष्ठ विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेटही बचाव कार्यात सामील झाले, असेही त्या म्हणाल्या.
WTC Final : शमीच्या मास्टर प्लॅनमध्ये असा अडकला मार्नस लॅबुशेन, जगातील अव्वल फलंदाजाची दांडी गूल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here