काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्र्यांना याच संदर्भात पत्र लिहिलं होतं. दारूची दुकानं सुरू होतात, पण जिम बंद आहेत हे दुर्दैव आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर लॉकडाऊन झुगारून जिम उघडण्याचं आवाहन जिम चालकांना केलं होतं. सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला असून ट्वीटरच्या माध्यमातून जिम चालकांची, व्यायामपटूंची आणि प्रशिक्षकांची व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. मुंबईतील एका जिम चालकानं लिहिलेलं पत्रही त्यांनी ट्वीट केलं आहे.
वाचा:
‘जिम, हेल्थ क्लब, व्यायामशाळा यावर उपजिविका असलेल्या सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. लॉकडाऊन असले तरी जागामालक भाड्यासाठी, बँकवाले हप्त्यांसाठी, शाळाचालक मुलांच्या फीसाठी तगादा लावत आहेत. पाणी बिल, वीज बिल भरावेच लागत आहे. आतापर्यंत जेवढी बचत होती तीही संपली आहे. त्यामुळं जिमचे चालक, मालक, प्रशिक्षकांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. त्यामुळं सरकारच्या ज्या काही अटी व नियम असतील, ते लागू करून जिम उघडण्याची परवानगी द्यावी, असं त्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. ह्याच पत्राच्या अनुषंगानं सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना जिम उघडण्यास मान्यता देण्याची विनंती केली आहे. ‘राज्यातील अनेक जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
आता अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने जीम पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times