म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक युती म्हणून एकत्र लढविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने देत असले तरी प्रत्यक्षात भाजपने मात्र दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. राज्यातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख घोषित करून भाजपने गुरुवारी ऐनवेळी स्वबळावर निवडणुका लढण्याची वेळ आली, तर आधीच तयारी करून ठेवली असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केले. सरकारच्या स्थापनेपासून शिंदे आणि फडणवीस हे भाजप-शिवसेना (शिंदे गट) राज्यातील सर्व निवडणुका युती म्हणून लढविणार असल्याचे सांगत आहेत. एकीकडे एकत्र निवडणुका लढविण्याचा निर्धार व्यक्त केला जात असताना दुसरीकडे मात्र भाजपने ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आयोजित करून वातावरण निर्मिती चालवली आहे. त्यात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख घोषित करून पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे स्पष्ट संकेत दिले. मात्र, त्याचवेळी ‘आम्ही आगामी सर्व निवडणुका युतीत लढविणार असल्याने आमचे निवडणूक प्रमुख शिवसेनेसाठीही काम करणार आहेत’, असे स्पष्ट केले. ‘पक्षाने नियुक्त केलेले निवडणूक प्रमुख भाजपबरोबरच शिवसेनेच्या उमेदवारांनाही सहकार्य करणार आहेत’, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ‘भाजप-शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २००पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे’, असेही त्यांनी नमूद केले.

Rahul Narvekar : लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य, गिरीश महाजनांचा थेट डोक्याला हात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने शशिकांत कांबळे, तर शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे प्रतिनिधित्व करत असलेल्या दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आमदार प्रसाद लाड यांची नेमणूक केली आहे. याशिवाय मुंबई उत्तरसाठी आमदार योगेश सागर, मुंबई उत्तर-पश्चिमसाठी आमदार अमित साटम, मुंबई उत्तर-पूर्वसाठी भालचंद्र शिरसाट, मुंबई उत्तर-मध्यसाठी पराग अळवणी, मुंबई दक्षिणसाठी मंगलप्रभात लोढा, नाशिकसाठी केदार नानाजी अहेर, दिंडोरीसाठी बाळासाहेब सानप, शिर्डीसाठी राजेंद्र गोंदकर, अहमदनगरसाठी बाळासाहेब वाकडे, जळगावसाठी डॉ. राधेश्याम चौधरी, रावेरसाठी नंदू महाजन, धुळ्यासाठी राजवर्धन कदमबांडे तर नंदुरबारसाठी तुषार रंधे यांच्या नावाची निवडणूक प्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा थेट शिवसेना भवनात सर्जिकल स्ट्राईक, ठाकरेंचा हुकमी एक्का लावला गळाला
उद्या नांदेडमध्ये शहा यांची सभा

मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपतर्फे सध्या सुरू असलेल्या महा जनसंपर्क अभियानात नांदेड येथे १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही राज्यात सभा होणार आहे. या अभियानात मोदी सरकारची कामगिरी सामान्य माणसापर्यंत पोहोचविली जाणार आहे. या अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. ‘घरोघरी जाऊन मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरित केली जाणार आहे. या माध्यमातून ३ कोटी कुटुंबांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत’, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, राहुल नार्वेकरांच्या सूचक विधानाची सर्वत्र चर्चा

असे आहेत निवडणूक प्रमुख (लोकसभा मतदारसंघ)

– कल्याण : शशिकांत कांबळे

– मुंबई उत्तर : आमदार योगेश सागर

– मुंबई उत्तर-पश्चिम : अमित साटम

– मुंबई उत्तर-पूर्व : भालचंद्र शिरसाट

– मुंबई उत्तर-मध्य : पराग अळवणी

– मुंबई दक्षिण : मंगलप्रभात लोढा

– दक्षिण-मध्य : प्रसाद लाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here