पटना- भोजपुरी गायक अभिषेक उर्फ बाबुल बिहारी याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. बिहारचा रहिवासी असलेल्या बाबुल बिहारी याच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याचाही आरोप आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी बुधवारी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी केली. यावेळी १३ वर्षीय पीडितेने संपूर्ण घटना सांगितली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण दोन वर्षे जुने आहे. गायक बाबुल बिहारी याने एका १३ वर्षीय मुलीला राजीव नगर येथील हॉटेलमध्ये नेण्याचे आमिष दाखवले. जिथे त्याने मुलीवर बलात्कार केला. एवढेच नाही तर मुलीचे फोटोही काढले. या घटनेनंतर तरुणीने आरोपीपासून अंतर ठेवले. इतके दिवस पीडितेच्या कुटुंबियांनाही या घटनेची माहिती नव्हती.

बाबुल बिहारी (भोजपुरी गायक बाबुल बिहारी) याने दोन वर्षांनंतर या घटनेची आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली, त्यानंतर तो पकडला गेला. पीडितेच्या कुटुंबियांनी हे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी मुलीची चौकशी केली. त्यानंतर पीडितेने त्या घटनेची माहिती दिली. यानंतर मुलीच्या पालकांनी बुधवारी पोलिसांत धाव घेतली.

Bhojpuri Singer Babul Bihari

बाबुल बिहारी विरोधात एफआयआर दाखल

पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बुधवारी गायकाला अटक केली. तसेच, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा आणि आयटी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला. पोलिसांनी या घटनेबाबत अधिकृत निवेदनही जारी केले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तो लवकरच आरोपी गायकाला न्यायालयात हजर करणार असून न्यायालयीन कोठडी मागणार आहे.

कोण आहे भोजपुरी गायक बाबुल बिहारी

बाबुल बिहारी या गायकाचे खरे नाव अभिषेक आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचं नाव बाबुल बिहारी असं ठेवलं आहे. इन्स्टा बायोमध्ये त्याने स्वत:ला भोजपुरी गायक आणि अभिनेता म्हटले आहे. याशिवाय त्याचे स्वत:चे यूट्यूब चॅनलही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here