मुंबई : अनेक घडामोडी आणि बातम्यांच्या आधारावर आज बाजारात कोणत्या शेअर्सकडे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. अशा शेअर्सची माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने तान्ला प्लॅटफॉर्म्स, एथर इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक, एल अँड टी फायनान्स, एचएएल, हिरो मोटोकॉर्प, टाटा पॉवर, ब्लू डार्ट, सीसीएल प्रोडक्ट्स आदी शेअर्सचा सामावेश असणार आहे.एथर इंडस्ट्रीज
एथर इंडस्ट्रीजने शाश्वत कन्व्हर्ज पॉलीओल्स तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणासाठी सौदी अरामको टेक्नॉलॉजीज कंपनीसोबत परवाना करार केला आहे.

रॉकेटच्या वेगाने धावत आहे एनर्जी स्टॉक, देतोय बंपर परतावा, गुंतवणूकदारांची झाली चांदी
कोटक महिंद्रा बँक
वृत्तानुसार कॅनडा पेन्शन फंड आज खासगी सावकार कोटक महिंद्रा बँकेतील आंशिक भागभांडवल ब्लॉक डीलद्वारे विकण्याची शक्यता आहे.

एल अँड टी फायनान्स
एल अँड टी फायनान्सच्या संचालक मंडळाने मार्च 2022-23 ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर 2 रुपये अंतिम लाभांश मंजूर केला आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करताय… ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नुकसान कमी होईल, जास्तीत जास्त नफा कमवाल
एचएएल
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या संचालक मंडळाची 27 जून रोजी बैठक होणार आहे. त्याचे इक्विटी शेअर्स विभाजित करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यात येईल.

हिरो मोटोकॉर्प
नव नियुक्त सीईओ निरंजन गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार हिरो मोटोकॉर्प व्यवसाय विस्ताराचा भाग म्हणून प्रीमियम प्ले वाढवण्यासाठी सध्याच्या विक्रीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करताना तिच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर श्रेणीचा विस्तार करण्यासाठी तयारी करत आहे.

टाटा पॉवर
टाटा पॉवरच्या नूतनीकरणक्षम उर्जा शाखेला टाटा स्टीलसाठी 966 मेगावॅट राउंड-द-क्वॉक (RTC) हायब्रिड अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुरस्काराचे पत्र प्राप्त झाले आहे.

गुंतवणूक करताय… हे लक्षात घ्या!

ब्लू डार्ट
सुधा पै यांची कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून पै कंपनीचे CFO म्हणून कार्यभार स्वीकारतील.

सीसीएल प्रोडक्ट्स
सीसीएल प्रोडक्ट्सने यूकेमध्ये नोंदणीकृत विविध ब्रँड्सच्या संपादनासाठी लॉफबर्ग ग्रुपसोबत मालमत्ता खरेदी करार केला आहे. अधिग्रहणामुळे कंपनी यूकेमधील मोठी सुपरमार्केट म्हणून गणली जाईल.

तान्ला प्लॅटफॉर्म्स
तान्ला प्लॅटफॉर्मच्या संचालक मंडळाने Valuefirst Middle East FZC आणि Vakuefirst Digital Media मधील 100 टक्के भागभांडवल संपादन करण्यास मान्यता दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here