मुंबई/ नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर () अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे. सीबीआयच्या पथकाने तपासाची दिशा निश्चित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे अधिकारी ‘क्राइम सीन’वर ‘सिमुलेशन’च्या माध्यमातून सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ()

घटनास्थळी जाऊन क्राइम सीन ‘रिक्रिएट’ करून घटनाक्रम समजून घेता येऊ शकतो आणि कदाचित या प्रकरणात एका निष्कर्षापर्यंत पोहोचता येऊ शकेल, असं सीबीआयला वाटतं. सुशांतसिंहला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात करण्यात आली आहे. त्यामुळे सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सीबीआयचे पथक सुरुवातीला करणार आहे.

‘रीकन्स्ट्रक्शन’च्या मदतीने तपासाला मिळणार दिशा

एखाद्या घटनेचा आणि गुन्ह्याचा उलगडा करण्यात ‘क्राइम सीन रीकन्स्ट्रक्शन’ची प्रक्रिया महत्वाची असते. अनेक हायप्रोफाइल प्रकरणांत या प्रक्रियेचा वापर सीबीआयकडून करण्यात आलेला आहे. यात आरुषी हत्या प्रकरण, नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा समावेश आहे. अशा प्रकारच्या ‘रीकन्स्ट्रक्शन’च्या माध्यमातून जे समोर येईल, ते अंतिम मानलं जाऊ शकत नाही, मात्र, तपासाला एक दिशा मिळू शकेल, असं सीबीआयला वाटतं.

बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे तपास

बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे सीबीआय तपास करणार आहे. त्यात कलम ३४१, ३४८, ३८०, ४०६, ४२०, ३०६ आणि १२० ब अन्वये सुशांतसिंहला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, फसवणूक, कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय सीबीआय मुंबई पोलिसांकडून सुशांत केसची डायरी, ऑटोप्सी रिपोर्ट, क्राइम सीनचे फोटो, मुंबई पोलिसांचे फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट, साक्षीदारांचे नोंदवलेले जबाब यांच्या प्रती घेणार आहे. सीबीआय आपल्या पातळीवर फॉरेन्सिक टीमकडून तपास करणार आहे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेणार आहे, असे समजते.

सीबीआयकडून ‘एसआयटी’ची स्थापना

या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयने एसआयटीची स्थापना केली आहे. सीबीआयचे जॉइंट डायरेक्टर मनोज शशिधर हे या एसआयटीचे प्रमुख आहेत. तर गगनदीप गंभीर, पोलीस अधीक्षक नुपूर प्रसाद आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल यादव हे या पथकात आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here