बंगळुरू : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कन्या परकला वांगमयीने ७ जून रोजी लग्नगाठ बांधली. बंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला असून लग्न अगदी साधेपणाने पार पडले, ज्यात फक्त कुटुंबातील सदस्यच सहभागी झाले होते. या लग्नाला कोणतीही राजकीय व्यक्ती किंवा व्हीव्हीआयपी उपस्थित नव्हते. निर्मला यांच्या लेकीचा विवाह प्रतिक दोशीशी हिंदू परंपरेनुसार उडुपी अदमारू मठाच्या संतांच्या आशीर्वादाने झाला.

Rs 2000 Notes: चिदंबरम यांना प्रत्युत्तर देत अर्थमंत्री सीतारामन हे काय बोलून गेल्या, नोटबंदीवर म्हणाल्या…
निर्मला सीतारामन यांच्या मुलीचे लग्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख सहकारी प्रतीक दोशी यांच्याशी झाला असून लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही ब्राह्मण परकला वांगमयी आणि प्रतीक यांचे वैदिक मंत्रोच्चार करून लग्न लावत आहेत. जवळच अर्थमंत्री निर्मला सीतारामन उभ्या आहेत. परकला वांगमयी ही एक पत्रकार असून देशातील अनेक माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे. इथे आप देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या मुलीचे पती प्रतीक दोशीचे काय करतात ते जाणून घेऊया.

कोण आहेत प्रतीक दोशी?
गुजरातचे रहिवासी प्रतीक दोशी पंतप्रधान कार्यालयात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून काम करतात. २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी प्रथम पंतप्रधान बनले होते, तेव्हा प्रतीक दिल्लीला गेले आणि जून २०१९ मध्ये त्यांना सहसचिव पदावर बढती मिळाली. सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलमधून प्रतीक दोशीने पदवी शिक्षण पूर्ण केले असून मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दोशीने यापूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले आहे.

आधी अर्थमंत्र्यांनी पाणी पिलं, राजनाथ सिंहही गालात हसले, घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट झाला!

PMO च्या (पंतप्रधान कार्यालय) वेबसाइटनुसार, प्रतीक दोशी पीएमओच्या रिसर्च अँड स्ट्रॅटेजी विंगमध्ये काम करतो. भारत सरकार (व्यवसाय वाटप) नियम, १९६१ च्या संदर्भात पंतप्रधानांना सचिवीय सहाय्य प्रदान करणे ही त्यांची भूमिका आहे, ज्यामध्ये संशोधन आणि रणनीतीचा समावेश आहे परंतु ते मर्यादित नाही.

पंतप्रधान मोदींचे खास प्रतीक दोशी
दोशी यांना पंतप्रधान मोदींचे ‘डोळे आणि कान’ मानले जाऊ शकतात. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार ते सरकारमधील उच्च नोकरशहा आणि महत्त्वाच्या लोकांवर ३६०-डिग्री पाळत ठेवतात. तसेच त्यांच्या निवड आणि प्लेसमेंटवर इनपुट आणि अभिप्राय देतात. याशिवाय प्रतीक तुम्हाला सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये क्वचितच दिसतील. ते कोणत्याही सोशल मीडियावर सक्रिय नसून ते त्यांचे तुलनेने लो-की प्रोफाइल ठेवतात.

अदानी प्रकरणात सरकारने सोडले मौन, अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका; पाहा काय म्हणाल्या
कोण आहे निर्मला सीतारामन यांनी मुलगी आणि पती?

निर्मला सीतारामन यांची मुलगी परकला वांगमयीने राष्ट्रीय वृत्तपत्रात काम केले असून दिल्ली विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच तिने नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मेडिल स्कूल ऑफ जर्नलिझममधून पत्रकारितेचे शिक्षणही घेतले आहे. दुसरीकडे, निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर एक राजकीय अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते संप्रेषण सल्लागार आहेत. जुलै २०१४ ते जून २०१८ दरम्यान त्यांनी आंध्र प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट पदही भूषवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here