सोन्या-चांदीचा आजचा भाव
चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असून जागतिक घडामोडींमुळे सोने-चांदीच्या किमतींवर दररोज परिणाम होतो. अशा स्थितीत आज खरेदीला जाण्यापूर्वी तुम्ही सोन्या-चांदीचा नवीन भाव जाणून घ्या. शुक्रवारी सोन्याचा भाव सपाट व्यवहार करत आहे, तर चांदीच्या किमतीत ०.१८% वाढ नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचे ऑगस्ट फ्युचर्स ५९ हजार ८९३ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत असून इंट्राडे नकारात्मक क्षेत्रात घसरल्यामुळे भाव दोन रुपयांनी वाढले. दुसरीकडे, एमसीएक्सवर चांदीचा जुलै फ्युचर्स १३२ रुपयांनी वाढून ७३,८०२ रुपये प्रति किलो या पातळीवर व्यवहार करत आहेत.
दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार सराफा बाजारात ९ जून रोजी सोने आणि चांदीची किंमत अनुक्रमे ५५ हजार २०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि ७३ हजार ४०० रुपये प्रति किलो आहे. मुंबई, कोलकाता, केरळ आणि हैदराबादमध्ये २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५,२००० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,२२० रुपये आहे.
भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याचे दर
- मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,०२२ रुपये प्रति ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची किंमत ५५,५२० रुपये प्रति ग्रॅम आहे.
- नवी दिल्लीत २४ कॅरेट दागिन्यांचे सोने प्रति ग्रॅम ६०,०३७ रुपये आणि २२ कॅरेट दागिन्यांचे सोने ५५,५३५ रुपये प्रति ग्रॅमने विकले जात आहे.
- पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,०२२ रुपये प्रति ग्रॅम तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ५५,५२० रुपये प्रति ग्रॅम आहे.
एक मिस्ड कॉलवर भाव जाणून घ्यासराफा बाजारातून सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्ही एक मिस्ड कॉल देऊन त्याची किंमत जाणून घेऊ शकता. त्यासाठी ८९५५६६४४३३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात SMS द्वारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
सोन्याची शुद्धता तपासा
दरम्यान, तुम्ही सोन्याची शुद्धता तपासून घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करू शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोनेचे दागिने किंवा नाण्यांवर एक हॉलमार्क म्हणजे HUID क्रमांक अंकित असतो. हा क्रमांक ॲप प्रविष्ट केल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे, ते तुम्हाला कळेल.