कमी पगारावर कर्ज कसे मिळेल?
कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या की बँका देखील कर्ज देण्यापूर्वी, ते ज्या अर्जदाराला कर्ज देत आहे, तो ते कर्ज परत करण्यास सक्षम आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे बँका कर्ज देण्यापूर्वी तुमच्या उत्पन्नाची सर्व कागपत्रे मागतात.
कर्ज मिळण्याची शक्यता कशी वाढवायची?
तुमचे उत्पन्न कमी असले तरी कर्ज मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता.
क्रेडिट स्कोअर
जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्ज देण्यास बँक तुम्हाला प्राधान्य देऊ शकते. यामुळे तुमचा पगार कमी असेल आणि कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा. ७५० पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर सामान्यतः चांगला मानला जातो.
नियमित आयकर फाईल करा!
कमी उत्पन्न असणारे करदाते आयकर भरण्याची गरज समजत नाही, जे योग्य नाही. जर तुमहाला एका आर्थिक वर्षात कोणतेही उत्पन्न मिळाले असले तरी तुम्ही आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नाचा इतिहासही तयार होतो आणि कर्जाच्या अर्जासोबत आयकर रिटर्न दस्तऐवज सबमिट केल्याने तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.
जुन्या कर्जाची परतफेड करा!
कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही सर्व जुनी कर्जे फेडली पाहिजेत. कमी उत्पन्न असलेल्या लोकांना तसेच ज्यांच्यावर आधीच कर्ज आहे, त्यांना बँका कर्ज देण्याचे टाळतात असे मानले जाते. त्यामुळे तुमच्या आधीच्या कर्जाची परतफेड करा.
पगारदार व्यक्तीला कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक
पासपोर्ट आकाराचा फोटो
आयडी प्रूफ (पॅन कार्ड किंवा आधार क्रमांक)
तीन महिन्यांची पगार स्लिप
दोन वर्षाचा फॉर्म-१६
पगार खात्याचे मागील सहा महिन्यांचे बँक विवरण
कर्ज घेण्यासाठी व्यावसायिक व्यक्तीला कोणती कागदपत्रे आवश्यक
पासपोर्ट आकाराचा फोटो
आयडी प्रूफ (पॅन कार्ड किंवा आधार कार्ड)
गेल्या तीन वर्षांचा ITR
दोन वर्षांचा फॉर्म ६०
जीएसटी इनव्हॉइसची प्रत
६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट