मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका ट्विटर हँडलवरुन आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्याविषयी भाष्य करण्यात आले आहे. यापैकी फेसबुकवरील पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आलेली आहे. तर सौरभ पिंपळकर या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा असलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन्ही ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या मजुकराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी पोलीस आयुक्तांनी याप्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन सुप्रिया सुळे यांना दिले.

Sharad Pawar : संभाजीनगर नाही, औरंगाबादच म्हणणार…शरद पवार खरंच असं म्हणाले की नाही? राष्ट्रवादीने मांडली बाजू

सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल करत कडक कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

भाजपमध्ये ती गोष्ट करण्याची धमक नाही, शरद पवारांनी देशातलं गणित सांगितलं, विरोधकांच्या एकजुटीवर म्हणाले…

शरद पवार यांची सुरक्षितता आणि त्यामागे कोणाचा अदृश्य हात आहे, हे समोर येणं महत्त्वाचं आहे. या सगळ्याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे न्याय मागतच आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडेही न्यायाची मागणी करत आहे. कारण शरद पवार हे देशाचे नेते आहेत आणि अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. महाराष्ट्रात गृहखाते सातत्याने अपयशी ठरत आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत तर केंद्रीय गृहखात्याने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. अमित शाह यांनी महिला सुरक्षेबाबतच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे. महाराष्ट्र हा शांतताप्रेमी आहे. अशा महाराष्ट्रात सातत्याने घटना कशा घडत आहेत, हा काही योगायोग नाही. नगर, सोलापूर, कोल्हापूर सारखंच कसं काय होतं राहतं, याचा अर्थ कुठला तरी अदृश्य हात काहीतरी करतच आहे ना. मग यासाठी सत्तेतील लोक जबाबदार असतात. पोलिसांचे गुप्तहेर खाते काय करत आहे? हे गृहखात्याचे अपयश आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

आधी औरंगाबाद म्हणाले, वाद वाढवायचा नाही म्हणत लगेच चूक सुधारली; शरद पवारांचा व्हिडिओ चर्चेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here