छत्रपती संभाजीनगर : देशभरामध्ये अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत असताना १४ वर्षीय शाळकरी मुलीवर एकाने अत्याचार केल्यानंतर त्याचा व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केलं. त्यानंतर नराधमाने त्याच्या तब्बल ५ मित्रांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार करायला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुरुवार दिनांक ८ रोजी सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा अक्षय चव्हाण, असीम पठाण त्याचा मित्र राम गायकवाड, त्याचा आणखी एक मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील सातारा परिसरात राहणारी कोमल (नाव काल्पनिक आहे) हिचं शिक्षण सुरू आहे. सध्या ती ९ वीच्या वर्गात शिक्षण घेते. दरम्यान २०२२ मध्ये कोमल ही एका मित्राच्या संपर्कात आली. मैत्री वाढल्यानंतर दोघांनी एक दुसऱ्यांचे मोबाईल नंबर शेअर केले. यानंतर नियमित सोशल मीडियावरही संपर्कात होते.

Cyclone Biporjoy : राज्यावर ३ दिवस अस्मानी संकट, चक्रीवादळामुळे मुंबईसह या भागांना धोक्याचा इशारा

१४ वर्षीय मुलीवर ६ जणांकडून बलात्कार

यानंतर जवळीक वाढल्याने मित्राने कोमलला भेटण्याचा हट्ट धरला. कोमल भेटायला आल्यानंतर तिच्यावर त्याने अत्याचार केला. यावेळी आरोपीने तिचा अश्लील व्हिडिओही शूट केला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपीच्या ओळखीच्या मित्रांनी ब्लॅकमेल करून तिच्यावरती वेळोवेळी अत्याचार केला. घाबरलेल्या पीडितेने वडील बाहेर गेल्यावर घरातील १० हजार रुपये रोकड, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा ऐवज घेऊन १४ वर्षीय मुलीने घर सोडले होते. ती पळून जाण्याच्या तयारीत असताना लोहमार्ग पोलिस व दामिनी पथकाने रेल्वे स्टेशनवर १८ मे रोजी तिला पकडले.

तिची चौकशी केल्यावर ही धक्कादायक माहिती समोर आली. तेव्हा बालकल्याण समितीने तिला बालगृहात ठेवण्याचे आदेश दिले. या कालावधीत तिचा रीतसर जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर बालकल्याण समितीने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानुसार १८५/२०२३ कलम ३७६ (ड)(अ), ३७६(३), ३७६(२) (जे), ३७६(२)(एन). ३७६(२), ३६३, ३६६(अ) भादवि सह कलम ४,५ (एल), ६,८, ९(एल),१०,११,१२,१६ पोक्सो अॅक्ट-२०१२ व ६६ (इ), ६७(बी) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम- २००० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime Diary: खोलीत तरुणीची तर प्लॅटफॉर्मवर गार्डची बॉडी; मैत्रिणीने उलगडलं सिक्रेट, मुंबईतल्या हॉस्टेलची हॉरर स्टोरी

रात्री घेऊन जायचे सकाळी आणून सोडायचे….

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, कोलमची तिच्या एका मैत्रिणीने तिची ओळख एका अल्पवयीन मुलाशी करून दिली. त्याने दुसऱ्या एका तरुणाशी ओळख करून दिली. ते दोघेही पीडितेला मोबाईलवरून मेसेज करायचे. ऑक्टोबर २०२२ मध्ये अल्पवयीन मुलाने पहाटे २ वाजता पीडितेला कॉल केला. तिला बळजबरी घराबाहेर बोलावून घेतले. तेव्हा आरोपी अक्षय चव्हाण आणि अल्पवयीन मुलगा तेथे होते. त्यांनी पीडितेला साई टेकडी परिसरात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्याचा मोबाइलमध्ये व्हिडीओ बनविला आणि अश्लील फोटो काढले.

विकृतीचा कळस! सुंदर दिसते म्हणून पत्नीला पंधरा वर्षांपासून मारहाण

यानंतर तिला पहाटे ५ वाजता तिला घरी आणून सोडले. त्यानंतर पुन्हा अल्पवयीन आरोपीने तिला धमकी देऊन साई टेकडी परिसरात नेले. मार्च – एप्रिल २०२३ मध्ये असीम पठाण (एचपी) याने अशाच प्रकारे पहाटे दीड वाजता फोन करून बोलावले आणि देवळाई रोडच्या बाजूला असलेल्या एका घरी नेऊन अत्याचार केला. दुसऱ्या वेळी त्याने त्याच्या मित्राला सोबत घेऊन दोघांनी अत्याचार केला. त्यानंतर त्याचा सहकारी राम गायकवाड आणि त्याचा मित्र या दोघांनीही अत्याचार केला.

Crime News: रेस्टॉरंटमध्ये ८० लोकांचा घोळका बसला होता, पोलिसांना संशय; गुपचूप गेले अन् पाहताच फुटला घाम…
दरम्यान, या सगळ्या घटनेची माहिती उघड होताच परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे. तर पीडित मुलीचीही वैद्यकीय चाचणी होणार आहे. या अशा घटना वारंवार समोर येत असल्यामुळे महिलांवरील अत्याचार कधी थांबणार असाच प्रश्न आता पालकांच्या समोर आहे.

Crime News: पोटच्या लेकीवर २५ वेळा चाकूने वार, पत्नी दिसताच बोटं कापली; बापाचा संताप ठरलं झोपेचं ठिकाण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here