सातारा : सध्या सुट्ट्या सुरू आहेत. यामुळे लोक फिरायला बाहेर पडत आहे. मात्र साताऱ्यात एका घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. कराड येथील कृष्णा कोयना नदीच्या प्रीतिसंगमात सेजल बनसोडे (१८) नावाच्या तरुणी बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सायंकाळी घडलेल्या या घटनेने कृष्णा घाटावर एकच खळबळ उडाली आहे.
पडीक इमारतीतील बिअर पार्टी जीवावर बेतली; नवी मुंबईत १९ वर्षीय तरुणीचा आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू

रात्री उशिरा तरुणीचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सेजल बनसोडे ही युवती कराड येथील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. कुटुंबियांसमवेत ती सायंकाळी प्रितीसंगम घाटावर गेली होती. सेजल नुकतीच बारावीची परीक्षा पास झाली होती. सेजल बनसोडे ही कराड नगरपरिषदेचे वरिष्ठ मुकादम मारुती काटरे यांची भाची आहे.

कराड तालुक्यातील रेठरे धरण येथील सेजल बनसोडे तिच्या नातेवाईकांकडे कराडला आली होती. नातेवाईकांसोबत ती प्रितीसंगम घाटावर फिरण्यासाठी गेली होती. त्याच दरम्यान त्यातील काही मुली नदीपात्रात उतरून पोहण्याचा आनंद घेत होत्या. एकूण चार मुली या नदीपात्रात उतरल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही होते. संगमातील खोल भागात या मुली गेल्यानंतर एका मुलीचा हात इतर मुलींकडून सुटल्याने सेजल ही नदीपात्रात बुडाली. तिच्यासोबत असणाऱ्या मुली आणि नातेवाईकांनी तात्काळ पात्रात उड्या घेत शोध मोहीम राबवली. ही घटना गुरूवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली आहे.

एकीचा पाय घसरला, वाचवायला गेलेल्या आठही जणी बुडू लागल्या, दोघींना जलसमाधी

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. संगमात साधारण दोन तासांहून अधिक वेळ शोध घेतल्यानंतर या युवतीचा मृतदेह शोधण्यात यश आले. या घटनेची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे. त्यानंतर मृतदेह येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here