१९व्या वर्षी सुरू केली कंपनी
मुंबईकर कैवल्य वोहराने इथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्याला दाखला मिळाला, पर्णातू अभ्यासापेक्षा त्याला स्टार्टअप्समध्ये जास्त रस होता. कैवल्यने वयाच्या १७ व्या वर्षी त्याचा मित्र आदित पलिचासोबत पहिला स्टार्टअप सुरू केला. शिक्षणासोबतच दोघेही उद्योजक बनले आणि स्टार्टअप GoPool ची स्थापना केली. अभ्यासासोबतच कंपनी चालवणे अवघड होत होते, त्यामुळे कैवल्य अभ्यास सोडून मुंबईत परतला.
झेप्टोची सुरूवात झाली कशी?
झेप्टो सुरू करण्याची कल्पनाही या दोघांना कॉलेजमध्ये असतानाच सुचली. जेव्हा-जेव्हा दोघे कोणताही माल मागवायचे तेव्हा तो माल त्यांच्यापर्यंत पोहोचायला किमान दोन दिवस लागायचे. यामुळे त्याला अशी एक कंपनी सुरू करण्याची कल्पना सुचली जी काही तासांत माल पोहोचवेल. त्यामुळे त्यांनी २०२१ मध्ये करोना काळात झेप्टोची सुरुवात केली. कंपनीची सुरुवात मुंबईतील १००० कर्मचारी आणि डिलिव्हरी एजंट्ससह करण्यात आली होती.
एक वर्षात ७३०० कोटींची कंपनी
करोना काळात जेव्हा लोक घराबाहेर पाडण्यासाठी संकोच करत होते तेव्हा झेप्टोची सुरूवात झाली आणि त्यांना याचा फायदाही मिळाला. एकाच महिन्यात त्यांनी २०० दशलक्षची कमाई केली तर एका वर्षात कंपनीचे मूल्यांकन $९०० दशलक्ष म्हणजेच ७३०० कोटी पार पोहोचले. तसेच झेप्टोचे संस्थापक कैवल्य वोहरा यांची एकूण संपत्ती १२०० कोटींच्या पुढे गेली असून तो देशातील सर्वात तरुण श्रीमंत बनला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये त्याचे नाव प्रथमच समाविष्ट करण्यात आले.
१० मिनिटात किराणा डिलिव्हरीचा आयडिया
सुरुवातीला झेप्टोला ग्राहकाला डिलिव्हरी करण्यासाठी ४५ मिनिटांपर्यंत वेळ लागायचा, परंतु कैवल्यने लक्षात घेतले की ज्या ग्राहकांना जलद वितरण प्राप्त होते ते त्यांच्या सेवेबद्दल अधिक समाधानी होते आणि त्यांनी पुन्हा पुन्हा ऑर्डर दिल्या. यासाठी त्यांनी झेप्टोमध्ये १० मिनिटांत डिलिव्हरीची संकल्पनाही राबवली. तर आधीपासूनच मार्केटमध्ये कार्यरत ब्लिंकिंट, बिग बझार यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी झेप्टोला १० मिनिटांच्या वितरण योजनेची आवश्यकता होती.
मग काय कंपनीने काही महिन्यांतच बंपर नफा कमावला. गेल्या एका वर्षात कंपनीचे मूल्यांकन ५०% हून अधिक वाढले आहे. आज झेप्टोचे मूल्यांकन ७३००० कोटी रुपयांवर पोहोचले असून अलीकडेच, कंपनीने Y Combinator आणि Glad Brook Capital या स्टार्टअप्सकडून $६० दशलक्ष निधी उभारला आहे. झेप्टो सध्या भारतातील १० प्रमुख शहरांमध्ये कार्यरत असून कंपनी सातत्याने आपले नेटवर्क वाढवत असताना कंपनीत १००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.