आता निवडणुकीसाठी सर्वच पक्ष त्यांच्या परीने कामाला लागले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत निवडणुकीसाठी रणनीती त्यांनी आखली. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना कोणत्या जागा सोडता येतील याचाही त्यांनी विचार केला.

हायलाइट्स:
- उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आढावा बैठक
- बैठकीत संजय राऊतांचीही उपस्थिती
- निवडणुकीसंदर्भात झाली चर्चा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वर्धापनदिनासाठी संजय राऊत शहरात आले होते. त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. त्यानंतर त्यांनी औरंगपुरा येथील शिवसेना भवनात जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची विधानसभा मतदारसंघनिहाय बैठक घेतली. ही बैठक एका अर्थाने ‘इनडोअर’ झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आपले कोण उमेदवार असू शकतात, त्यांची ताकद कशी असेल याची चाचपणी त्यांनी केली. फुलंब्री आणि सिल्लोड विधानसभा मतदार संघ युतीमध्ये असताना भाजपकडे होता.
छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघदेखील भाजपकडे आहे या तीन मतदारसंघात आपली रणनिती कशी असावी, बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी केली जावी, याबद्दल त्यांनी चर्चा केली आणि आढावा घेतला. नऊ मतदारसंघांपैकी कोणते मतदारसंघ आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडता येतील, त्यांना मतदारसंघ न सोडल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाजदेखील राऊत यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या वेळी पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, किशनचंद तनवाणी यांची विशेष उपस्थिती होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.