ठाणे: मिरा रोड येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी समोर आला होता. मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे दोघेजण गीतानगर परिसरातील गीता आकाशदीप इमारतीमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. या दोघांमध्ये झालेल्या वादातून मनोजने सरस्वती यांच्या हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता या हत्याप्रकरणातील नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. मनोजने सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाचे विद्युत करवतीने आणि एक्सॉ ब्लेडच्या सहाय्याने असंख्य बारीक तुकडे केले होते. हे तुकडे मनोजने प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले होते, त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार केली होती. अशाप्रकारे मनोज एक-एक करुन सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता.

Mira Road Murder: मनोज सानेच्या दाव्याने नवा ट्विस्ट, सरस्वतीचा मृत्यू कसा झाला, पोलिसांना काय सांगितलं?

मनोजने मृतदेहाचे तुकडे करुन ते मिक्सरमध्ये टाकल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकजण अवाक झाले होते. मनोजच्या या कृतीबद्दल संताप व्यक्त केला जात होता. ३ जूनच्या मध्यरात्री मनोजने सरस्वतीची हत्या केली आणि ४ जूनच्या पहाटेपासून पुढले सलग ४ दिवस तो बाथरुममध्ये बसून मृतदेहाचे तुकडे करत होता. हे तुकडे बाहेर उघड्यावर तसेच फेकून देणे धोकादायक होते. त्यासाठी मनोज हाडे आणि मांस वेगळे करण्यासाठी एकेक अवयव कुकरमध्ये शिजवत होता, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली. पोलिसांनी मनोजच्या फ्लॅटमधून सरस्वती यांच्या मृतदेहाचे १७ ते १८ तुकडे हस्तगत गेले होते. मात्र, त्यांचे शिर सापडले नव्हते. मनोजने सरस्वतीचे मुंडके कुठे टाकले, याचा पोलिसांकडून शोध होणे अपेक्षित होते. परंतु, मनोजने चौकशीदरम्या आपण सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाच्या डोक्याचेही असंख्य तुकडे केल्याचे सांगितले. हे सर्व तुकडे पोलिसांनी तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात पाठवले आहेत. आता तपासणीनंतर हे कोणते अवयव होते, हे समजू शकेल. मनोज साने हा कमालीचा शांतपणे वागत असून तपासात सहकार्य करत नाही, असे पोलिसांनी सांगितले.

दोन-तीन दिवसांपासून मनोज कुत्र्यांना खायला घालत होता, ते वाक्य ऐकताच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली

मनोज सानेला असाध्य आजार?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रमेश साने याने आपण HIV Positive असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. २००८ साली झालेल्या एका अपघातावेळी मला दुसऱ्या व्यक्तीचे रक्त देण्यात आले होते. त्यामधून आपल्याला एचआयव्हीची लागण झाल्याचे मनोजन म्हटले. मी आणि सरस्वतीने कधीही शरीरसंबंध ठेवले नाहीत. सरस्वती मला मुलीसारखी होती, असा दावा मनोज सानेने चौकशीदरम्यान केला.

पोलिसांच्या हाती पिशव्या, कुत्र्यांचा भेसूर आवाज.. मीरारोडमध्ये थरकाप उडवणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here