म. टा. प्रतिनिधी, : करोनासदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी शहरातील एमजीएम रुग्णालयातील महिला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

शहरातील एका खासगी रुग्णालयातून ७० वर्षे वयाच्या करोनासदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णाला एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे या रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णाची प्रकृती अधिकच खालावली आणि काही तासांनी रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी रुग्णालयातील आयसीयूमध्ये सेवा देत असलेल्या महिला डॉक्टरवर हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे रुग्णालयामध्ये एकच गोंधळ उडाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनाने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे, अशी माहिती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

लातूरमध्येही झाला होता डॉक्टरांवर हल्ला

याआधी लातूरमध्येही एका डॉक्टरवर हल्ला झाला होता. लातूर येथील अल्फा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात करोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत असून, या रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाइकानं डॉक्टरांवर चाकूनं हल्ला केला होता. सुदैवानं या हल्ल्यातून डॉक्टर बचावले होते. चार दिवसांपासून रुग्ण या रुग्णालयात दाखल होता. ते वयोवृद्ध होते. त्यात त्यांना मधुमेहाचा त्रास होता. रुग्णाची प्रकृती गंभीर होती हे नातेवाइकांना माहीत होते. मात्र, रुग्ण दगावल्यानंतरही त्याच्या एका नातेवाइकानं डॉ. वर्मा यांच्यावर चाकूने हल्ला केला. लातूरमधील संघटनेनं या घटनेचा निषेध केला होता.आरोग्य यंत्रणा अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहे. अशावेळी रुग्णांच्या नातेवाइकांनीही सहकार्य करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here