मटा प्रतिनिधी:
पदे वाटपावरून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेले नाराजी सत्र नियुक्त्यांमध्येही रंगल्याचे दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्तीवरून असाच वाद उफाळला असून कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झालेले महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाराज झाले आहेत. ‘आपल्याला कोणत्याच जिल्ह्याचे नको, आपल्याऐवजी पक्षाच्या कोणत्याही मंत्र्याला ते द्यावे,’ अशी मागणी थोरात यांना भेटून करणार आहेत.

काल रात्री पालकमंत्री नियुक्तीची यादी जाहीर झाली. त्यानंतर थोरातांनी ही भूमिका घेतल्याचे त्यांच्या निटवर्तीयांकडून समजले. थोरात आजच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पालकमंत्र्यांची यादी तयार करताना थोरात यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. त्यांची नियुक्ती करताना आणि त्यांच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्तीही परस्पर झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

वाचा:

अहमदनगरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केलेल्या मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद द्यावे आणि आपल्याऐवजी काँग्रेसमधील इतर कोणत्याही मंत्र्याला अहमदनगरचे पालकमंत्रिपद द्यावे. आपल्याला कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको, अशी भूमिका आता थोरात यांनी घेतली असल्याचे सांगण्यात येते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here