पुणे (शिरूर) : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार गावचा गाडा आता पती – पत्नी हाकणार आहेत. या गावच्या सरपंच आणि उपसरपंचपदी चक्क पती आणि पत्नी झाले आहेत. या निवडीने गावातील विकासाला चालना मिळणार असल्याचं बोलले जात आहे. सरपंचपदी पत्नी दिपाली दिपक खैरे यांची तर उपसरपंचपदी दीपक सुरेश खैरे यांची निवड झाली आहे.

हिवरे कुंभार गावच्या सरपंच शारदा विकास नाना गायकवाड यांनी महिन्याभरापूर्वी राजीनामा दिल्याने हे सरपंच पद रिक्त झाले होते. त्यानंतर दिपाली खैरे यांची ग्रामस्थांच्या वतीने सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पवारांना धमकी देणाऱ्याचं नाव-गाव समजलं, भाजप कार्यकर्ता असल्याचा ट्विटरवर उल्लेख
हिवरे कुंभार गावच्या उपसरपंच पदी दीपक खैरे यांची अगोदरच निवड झाली आहे. आता त्यांच्या पत्नीची सरपंचपदी निवड झाल्याने गावचा कारभार पती पत्नीच्या हातात आला आहे. दिपाली खैरे या अगोदर ग्रामपंचायत सदस्या होत्या. त्या उच्चशिक्षित असून त्या आता घराच्या जबाबदारी सोबतच गावचा कारभार देखील सांभाळणार आहेत. खैरे पती पत्नीच्या हातात कारभार आल्याने गावचा विकास १०० टक्के होणार, असा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

या निवडणुकीवेळी पाबळ मंडल अधिकारी प्रशांत शेटे, ग्रामसेवक वनिता माने, तलाठी अश्विनी जोरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव शिरूरचे उपाध्यक्ष अमोल जगताप, शहाजी मामा जाधव, रेवननाथ जगताप, माजी सरपंच शारदाताई गायकवाड, विश्वनाथ शिर्के, सोमनाथ आढागळे, संध्या गायकवाड, हौसाबाई जगताप, नयना मांदळे, श्यामराव साळुंखे, भाऊसाहेब साळुंखे, संतोष गायकवाड, आनंदा खैरे, राजेंद्र साळुंखे, फक्कड साळुंखे, चेअरमन पंढरीनाथ तांबे, पांडुरंग मांदळे, अष्टविनायक एज्युकेशन सोसायटीचे कारभारी पुंडे, सोमनाथ मांदळे, मधुकरराव शिर्के, उद्योजक विकास नाना गायकवाड, प्रदीप मांदळे, शामल जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

WTC 2023: जिथे सगळे ठरले फेल तिथे रहाणेचं बेस्ट! झंझावाती खेळीसह आपल्या नावे केली मोठी कामगिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here