पुणे : महसूल खात्यातील अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या कार्यालय आणि निवासस्थानी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने शुक्रवारी दुपारी अचानक छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड असे छापा टाकण्यात आलेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सीबीआयच्या पथकाने पुण्यातील कॅम्प परिसरातील लष्कर भागातील शासकीय वसाहतीत सदरची कारवाई केली. शासकीय वसाहतीत राहणाऱ्या महसूल खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने छापा टाकून कारवाई करत महत्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली.

मुंबईत फ्लॅट, गावात जमीन, लाखावर पगार, समीर वानखेडेंची एकूण संपत्ती किती?

तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात देखील सीबीआय अधिकारी दाखल होऊन त्यांनी चौकशी सुरू केली आहे. सीबीआयच्या पथकाकडून महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पवारांना धमकी देणाऱ्याचं नाव-गाव समजलं, भाजप कार्यकर्ता असल्याचा ट्विटरवर उल्लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here