जालना : समृध्दी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी महामार्गावर भीषण अपघात झाला. महामार्गावर गाडी क्रमांक एमएच ४९ बीडब्ल्यू ०६१५ या वाहनानं कंटेनरला क्रमांक सीजी ०४ जेडी ०१०४ मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांनी जागीच आपला जीव गमावला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे.

मृतांमध्ये एक पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सर्वांना महामार्ग पोलीस आणि एमएसएफच्या मदतीने जालना आणि सिंदखेडराजा यांच्या रुग्णवाहिकेने समृध्दी महामार्गाचे डॉक्टर यासीन शाह यांच्या मदतीने सामान्य शासकीय रुग्णालय जालना येथे पाठवले आहे. अपघातग्रस्त वाहन जागेवरच असून कंटेनर चालक हा पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

महसूल खात्यातील अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या घरी सीबीआयचा छापा, पुण्यात खळबळ
नागपूर येथील राणोजी शिवराम पिजारे (वय ५०), शांताबाई पुरे आणि मालुबाई पुरे या तिघांचा अपघातात जागेवरच मृत्यू झाला आहे. सुरज तिजारे हे गंभीर जखमी आहेत. हे चौघे अहमदनगर येथून नागपूरला चालले होते. यामध्ये फक्त सुरज तिजारे याची प्रकृती गंभीर आहे. महामार्ग पोलीस केंद्राचे पी.एस.आय साखरे, ए.एस.आय. चाटे, पो.कॉ. बिजुले, पो.कॉ. बेडेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं.

नवरा-बायको हाकणार गावचा गाडा; पुण्यातील या गावात दोघांची सरपंच-उपसरपंचपदी निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here