मुंबई : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नातीचे नामकरण करण्यात आले आहे. अंबानींचा मोठा मुलगा आकाश आणि सूनबाई श्लोका मेहता-अंबानी यांना बुधवारी कन्यारत्न झाले. लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या चिमुकलीचे बारसे करण्यात आले आहे.

आकाश आणि श्लोका यांनी आपल्या लेकीचे ‘वेदा आकाश अंबानी’ असे सुंदर नामकरण केले आहे, अशी माहिती विरल भयानी यांनी दिली आहे. वेदा या नावाचे मूळ संस्कृतमध्ये आहे. याचा अर्थ ज्ञान असा होतो.

नावाचा सुंदर अर्थ

वेद हे प्राचीन भारतीय शास्त्रातील पवित्र लिखित ग्रंथ आहेत. ते संस्कृत साहित्यातील सर्वात जुना प्रकार मानले जातात. देवाच्या मार्गदर्शनाखाली विद्वानांनी वेद लिहिल्याचे हिंदू पुराणात मानले जाते.

Tata Group: टाटांची नेक्स्ट-जेन, कोण आहे माया टाटा? ५६००० कोटींची संपत्ती असलेल्या महिलेशी आहे खास नाते
डिसेंबर २०२० मध्ये श्लोका आणि आकाश यांच्या मोठ्या मुलाचा जन्म झाला. त्यांनी बाळाचे पृथ्वी असे नामकरण केले. तर अडीच वर्षांनी त्यांच्या घरात पुन्हा एकदा किलबिलाट झाला.

मुकेश अंबानी कुटुंबीयांसह श्रीसिद्धीविनायकाच्या चरणी

वेदाच्या आगमनामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी तिसऱ्यांदा आजी-आजोबा झाले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा आणि जावई आनंद पिरामल यांच्या पोटी कृष्णा आणि आदिया या जुळ्या बाळांचा जन्म झाला. त्यामुळे अंबानींना आता चार नातवंडं आहेत.

पतीचे निधन, मुलांमध्ये दुरावा, ‘या’ महिलेने मिटवला वाद; अंबानींच्या घरातील ‘मेन लेडी’
दरम्यान, एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट लवकरच मुकेश यांचा धाकटा मुलगा अनंतची पत्नी होणार आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here