प्रसाद शिंदे, अहमदनगर : पोरीनं स्पर्धा परीक्षा दिली होती, पण निकाल लागत नव्हता. आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने, तिला त्यांचे दु:ख पाहवत नव्हते. पोलीस भरतीची माहिती मिळाली आणि स्वत:च्या कष्टाच्या जिवावर ती पोलीस झाली. पण दोनच महिन्यात एमपीएससीचा निकाल लागला आणि त्यात पास होऊन ती थेट पोलीस उपनिरीक्षक बनली.

श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे या छोट्याशा गावातील मजुराच्या मुलीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलं. आधी पुणे शहर पोलिसपदी निवड झाली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षपदी नियुक्ती झाली. प्रियंका पंडित कांबळे असं या मुलीचं नाव आहे. येळपणे या छोट्याशा गावातील रहिवासी असलेले आणि मोलमजुरी करणारे पंडित गणपत कांबळे हे अल्पशिक्षित असून, घरची थोडी शेती पाहून मोलमजुरी करतात. पती, पत्नी व एक मुलगी, एक मुलगा असा त्यांचा सुखी परिवार आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल; भाई जगतापांची उचलबांगडी, अध्यक्षपदी वर्षा गायकवाडांची नियुक्ती
शिक्षण सुरू असताना प्रियांका कांबळे यांचं लहानणापासूनच पोलीस खात्यात अधिकारी व्हायचं स्वप्न होतं. येळपणे येथून त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सी.टी बोरा महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. पोलीस खात्यात वरिष्ठ अधिकारी व्हायचं स्वप्न असल्याने मेहनत घेऊन रात्रंदिवस अभ्यास केला.

दोन वर्षांपासून जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली. यात २०२३ मध्ये यश मिळाले. पोलीस भरतीत यशस्वी झाल्यानंतरही त्यांनी आपले प्रयत्न न थांबवता अभ्यास सुरुच ठेवला. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अखेर पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झाली.

आई-वडील मोलमजुरी करत असलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून प्रशासकीय सेवेत नोकरी करण्याची ध्येय ठेवलं. स्वयंशिस्त आणि समर्पणाची भावना मनात ठेवा. मेहनत, चिकाटी असणे आवश्यक आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य काही नाही.

वॉर्नरला बाद केल्यावर कोहलीच्या एका कृतीने चाहतेही घायाळ, Video मध्ये पाहा नेमकं काय घडलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here